सूर्या फौंडेशनच्यावतीने गरजू रुग्णांना वैद्यकीय उपकरणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

सूर्या फौंडेशनच्यावतीने गरजू रुग्णांना वैद्यकीय उपकरणे

 सूर्या फौंडेशनच्यावतीने गरजू रुग्णांना वैद्यकीय उपकरणे

अध्यक्ष काका शेळके यांनी केला जनसेवेचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या महामारीत देशातील अनेक नागरिकांचे हाल झाले.नागरिकांना विविध आजाराच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाली.अनेक नागरिक या कोरोनातून बरे झाले पण त्याचे दुष्परिणाम आजूनही त्यांच्या शरीरात विविध आजारांनी होत आहे.या आजारांवर लढण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या वैदकीय उपकरणांची गरज पडते. महामारीत अनेकांचे रोजगार उधवस्त झाले आणि ते अडचणीत सापडले आहे. ज्यांना शक्य नाही अशा रुग्णांना सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एक मदतीचा हात म्हणून प्रभाग पाच मधील सिव्हील हाड्को गणेश चौक येथील सूर्या फौंडेशनच्या वतीने गरजू रुग्णांना वैदकीय उपकरणे मोफत उपलब्ध करण्यात आले आहे.
  या वैदकीय उपकरण केंद्राचे उद्घाटन माजी नगरसेविका कलावती शेळके याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काका शेळके, काका औटी, मते सर, काका मुळे, रवी राऊत, रोहित रोकडे, सागर गायकवाड, सुमित गांगुर्डे, अमोल बागडे, सागर खळे, प्रसाद खरात, युवराज लालबेगी, ज्ञानेश्वर राईंस, पप्पू शेळके, संग्राम शेळके, अथर्व गंगावणे, मयुरेश दुडम, प्रणव येल्लाराम, शेखर ढूमणे, रवी बोडखे, पंकज चव्हाण, अनिल मगर, अक्षय जुमेवाल, बंडू भोसले सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
 याप्रसंगी कलावती शेळके म्हणाल्या आज सर्वांवरच विकट वेळ आलेली आहे.या कोरोनाच्या नष्टते पर्यंत आपण सर्वांनाच खूप काळजीपूर्वक वावरणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी तोंडावर मास्क असले पाहिजे दोन फुटाचे अंतर असले पाहिजे हे अत्यंत महत्वाचे आहे.नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कि देशाला सद्या फक्त कोरोनावर लक्ष केंद्रित करायचे आहे.त्यामुळे सर्वानीच नियमांचे पालन स्वताच्या आणि दुसर्‍याच्या सुरक्षतेसाठी केलेच पाहिजे.मी सर्वाना आव्हान करते ज्यांना हा उपकरणांची गरज असेल त्यांनी निसंकोपण घ्यावीत.कोणतेही आणि कितीही मोठे संकट आले तरीहीकायम आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here