मैदाने खुली करण्याची शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षण महासंघाची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 27, 2020

मैदाने खुली करण्याची शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षण महासंघाची मागणी

 मैदाने खुली करण्याची शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षण महासंघाची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रोगप्रतिकारक क्षमता ही व्यायामातून विकसित होत असल्याने लवकरात लवकर मैदाने खुली करावीत अशी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुनील जाधव, दिनेश भालेराव, घनश्याम सानप, विजयसिंह मिस्कीन, सचिन काळे, कृष्णा लांडे, गुलजार शेख, अमित चव्हाण, संतोष काळे तसेच जिल्हा अध्यक्ष सुनील गागरे, सचिव शिरीष टेकाडे, नंदकुमार शितोळे, दिव्यांगी लांडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हाक्रिडा अधिकारी यांना ईमेल निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात मागील मार्च महिन्यापासून जीम, मैदाने बंद होती. शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यभरातील मैदाने, जीम खुली केली. पण अहमदनगर जिल्ह्यातील खुल्या मैदानावरील सराव बंद असल्याने खेळाडू हवालदिल झाले आहेत. त्यामुळे इनडोअर खेळासोबतच मैदानी खेळांच्या सरावास परवानगी द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
खेळ हा विद्यार्थ्यांचा स्थायीभाव आहे. अनेक खेळाडू आपल्या आवडीच्या खेळामध्ये भाग घेतात, तर बहुतांश खेळाडू आवडीच्या खेळामध्ये मैदानावर तासनतास सराव करून क्रीडा स्पर्धेच्या रूपाने आपले नशीब अजमावत असतात. पण गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे हजारो विद्यार्थ्यांना घरात बसण्याची वेळ आली. मध्यंतरीच्या काळात राज्यभरातील अनेक मैदाने खेळाडूंसाठी खुली करण्यात आली. कोरोना सद्यस्थितीत आटोक्यात आला आहे, तरी देखील नगर जिल्ह्यात मैदाने खुली करण्यास परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. विविध राष्ट्रीय फेडरेशन मार्फत क्रीडा स्पर्धेच्या तारखा डिसेंबर-जानेवारीत जाहीर करण्यात आल्या असल्याने नगर जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंत खेळाडू मैदाने खुली न केल्यास या स्पर्धेपासून मुकण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here