एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विक्रीची एमपीव्ही; 5.5 लाख विक्रीचा टप्पा पार केला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विक्रीची एमपीव्ही; 5.5 लाख विक्रीचा टप्पा पार केला

 एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विक्रीची एमपीव्ही; 5.5 लाख विक्रीचा टप्पा पार केला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरी आणि स्टायलिश भारतावर भर देत तयार करण्यात आलेल्या मारुती सुझुकीच्या नेक्स्ट जेन एर्टिगा या गाडीत स्टाईल, आरामदायीपणा आणि अनेकविध तंत्रज्ञानाचा मेळ आहे. त्यामुळेच या गाडीने ग्राहकांची मने जिंकत देशातील अव्वल क्रमांकाच्या विक्रीची एमपीव्ही बनण्याचा मान मिळवला आहे. 5.5 लाखांहून अधिक ग्राहकसंख्येसह या गाडीने मागील 2 वर्षांपासून बाजारपेठेतील नेतृत्वस्थान कायम राखले आहे. आर्थिक वर्ष 20 -21 मध्ये सप्टेंबर 20 पर्यंत सुमारे 47 टक्के बाजारवाट्यासह एर्टिगाने एमपीव्ही विभागात आपले अस्तित्व बळकट राखले आहे.
एर्टिगा म्हणजे मारुती सुझुकीच्या उत्क्रांतीक्षम डिझाइन धारणा आणि तांत्रिक क्षमतांचे प्रतिक आहे. महत्त्वाकांक्षी, ब्रँड मूल्याला महत्त्व देणार्‍या, आरामदायीपणा हवा असणार्‍या आणि ज्यांना एकत्र असणं आवडतं असे लोक या गाडीचे ग्राहक आहेत. कौटुंबिक तसेच व्यावसायिक गरजांसाठी ही गाडी अगदी योग्य ठरते.
या यशाबद्दल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (मार्केटिंग अ‍ॅण्ड सेल्स) श्री. शशांक श्रीवास्तव म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून ब्रँड एर्टिगाने आपल्या उत्तम स्टाइल, जागा, आरामदायीपणा, सुरक्षा आणि विविध तांत्रिक वैशिष्ट्यांनी बहुपयोगी एमपीव्हीच्या संकल्पना नव्याने मांडल्या. भारतातील पहिली कॉम्पॅक्ट एमपीव्ही म्हणून एर्टिगाने सातत्याने नाविन्यतेचा वारसा जपला आहे.5.5 लाख विक्रीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे या गाडीच्या यशाचे द्योतक आहे.
एप्रिल 2012  मध्ये सादर झालेल्या एर्टिगाने संपूर्णत: नवा मल्टी-युटिलिटी विभाग तयार केला. 1.5 ली. के सीरिज इंजिन, स्मार्ट हायब्रिड आणि एटी तंत्रज्ञानाने सज्ज ही गाडी चालवण्याचा अनुभव सुखद असल्याची खात्री पटते. या गाडीच्या अव्वल वैशिष्ट्यांमध्ये भर घालत मारुती सुझुकी एर्टिगा ही एकमेव एमपीव्ही ठरली आहे ज्यात फॅक्टरी फिटेड एस-सीएनजी तंत्रज्ञान आहे.
एर्टिगाच्या आकर्षक बाह्यसजावटीला क्रोम स्टडेड फ्रंट ग्रील, प्रोजेक्टर हेडलँप्स आणि 3डी टेल लँप्सची जोड देण्यात आली. यातील डॅशबोर्डला मेपल वुड फिनिश आणि क्रोम रंगामुळे अभिजात सौंदर्य प्राप्त होते. तिसर्‍या रांगेतील रीक्लायनर्स, अत्यंत आरामदायी आणि सोयीनुसार वापरता येणारे सीटिंग आणि मोठी लगेजची जागा अशा प्रशस्त जागेमुळे ही गाडी ग्राहकांची लाडकी ठरली आहे. स्टीअरिंगमध्ये असलेले ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल्स, एअर कुल्ड कप होल्डर्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि प्रत्येक रांगेसाठी असलेले चार्जिंग सॉकेट यामुळे या गाडीच्या स्टाइलमध्ये उपयुक्ततेची भर पडते. ड्युएल एअरबॅग्स, हिल होल्ड (फक्त एटी), आयएसओ एफआयएक्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (फक्त एटी) आणि ईबीडीसह एबीएस अशा बहुविध वैशिष्ट्यांमुळे नेक्स्ट जेन एर्टिगामध्ये कमालीची सुरक्षा मिळते.

No comments:

Post a Comment