कँटोन्मेंट टोल नाका लुटण्याचा प्रयत्न! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, November 21, 2020

कँटोन्मेंट टोल नाका लुटण्याचा प्रयत्न!

 कँटोन्मेंट टोल नाका लुटण्याचा प्रयत्न!

हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी? 3 जण जखमी; 3 जण गजाआड..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट इन्चार्ज अजय शिंदे, सुपरवायझर सचिन पवार, यांना हप्ता मागत त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन टोल नाका लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रात्री 9:30 च्या दरम्यान घडली असून सराईत गुन्हेगार संदीप उर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरुडगाव रोड, भागवत चाळ, नगर) यास काल रात्रीच भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य 2 आरोपी विक्रम गायकवाड. (रा. वाळुंज पारगाव) प्रकाश भिंगारदिवे (रा. कोंबडी वाला मळा ता. नगर) यांना आज दुपारी अटक करण्यात आली असून अन्य आरोपी बाबा आढाव. (रा. वाळुंज पारगाव, ता. नगर) हा फरार आहे.
आरोपी यांनी या गुन्ह्यात नंबर नसलेल्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, निळ्या रंगाची बजाज मोसा (एमएच16बीआर1928) काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोसा (एमएच 20एपी2760) चा वापर करून टोलवरील गल्यातील रोख रक्कम 46 हजार 740 रुपये पळून नेले.
सदर घटनेची हकीकत अशी की काल रात्री 9.30 च्या दरम्यान आरोपी यांनी सोलापूर रोड वरील छावणी परिषद नाका येथे स्कॉर्पिओ वाहनातून व बजाज पल्सर मोसा स्प्लेंडर वरुन घेऊन आरोपीनी कमरेस लावलेल्या हत्यार काढून नाकावरील सुपरवायझर सचिन तुकाराम पवार यास आम्हाला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली सुपरवायझर सचिन पवार याने तुम्ही आमचे मॅनेजर मधुर बागायत यांचे बरोबर बोला असे सांगितले आरोपींना याचा राग येऊन सचिन यास धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली सचिन याला रोडच्या कडेला नेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी  तेथे आल्यानंतर तुम्ही वाद घालू नका जे बोलायचे असेल ते साहेबांशी बोला असे म्हणाले असता बाबा आढाव याने त्याच्या कमरेला असलेल्या कोयता सारखे हत्यार काढून सचिन पवार यास आम्हाला जर हप्ता दिला नाही तुला जीवे ठार मारून टाकू असे म्हणून त्याच्या मानेवर हत्यार मारणार तेवढ्यात त्याने तो वार हलचाल केल्याने त्याच्या दंडावर लागला त्यात तो जखमी झाला तेव्हा त्याच्या जवळ कर्मचारी जमा झालेले पाहून आरोपींनी कॅश काऊंटर  ला जाऊन तेथील असलेल्या हनुमंत प्रकाश देशमुख यास मारहाण करून जमा झालेली 46,740 रोख रक्कम मारहाण करून काढून घेतली.
नाक्यावरील कर्मचारी जमा झालेचे पाहून आरोपी वाहने तेथेच टाकुन पळुन गेले. आरोपी पळून गेल्यानंतर भिंगार पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. नगर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट देेवून तपासाचे आदेश दिले.भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पीआय प्रवीण पाटील हे रजेवर असल्याने त्यांचे जागी तोफ खाना पोलीस स्टेशनचे एपीआय सुरशे यांच्याकडे पदभार असल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख पुढील तपास करीत आहेत. पोलीस कॉन्स्टेबल राजू सुद्रिक, समीर शेख यांनी आरोपींना 24 तासांचे आत गजाआड केले असून आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here