भारतीय आर्मीमध्ये भरती झालेल्यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

भारतीय आर्मीमध्ये भरती झालेल्यांचा सत्कार

भारतीय आर्मीमध्ये भरती झालेल्यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः माका परिसरातील आडगाव(पाथर्डी),वाघोली(शेवगाव),माका, म.ल.हिवरे, देडगाव(नेवासे)येथील सुमारे दहा तरुण एकाचवेळी भारतीय आर्मीमध्ये सैनिक म्हणुन भरती झाल्याने एक नवीन विक्रम या परिसरातुन झाला आहे. परिसरातील एकाच वेळी,अनिकेत शिवाजी दारकुंडे, खंडु भगवान सोनार, राहुल बाबासाहेब खताळ, विशाल गोयकर, राज पटारे, संतोष सानप, ज्योतीरलिंग गोयकर,चंद्रशेखर डोळसे,या तरुणांचा ग्रामस्थांच्यावतीने फेटे, हार, श्रीफळ देवुन मोठ्या संख्येने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सैन्यदलातील माजी मेजर अशोक गवांदे यांनी तर,प्रमुख पाहुणे भगवान  गंगावणे,खंडुभाऊ लोंढें,बबन भानगुडे,अशोक वाघमोडे,  तसेच रासपचे नेवासे तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी या तरुणांचे सत्कार केले.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सानप सर यांनी केले व कोकाटे गुरुजी, गायकवाड सर, रवींद्र पागिरे, सहदेव लोंढें यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन बारकु खेमनर यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here