तोटे कुटुंबीयांनी वाटले घराघरात उद्योजकतेचे साहित्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, November 27, 2020

तोटे कुटुंबीयांनी वाटले घराघरात उद्योजकतेचे साहित्य

 तोटे कुटुंबीयांनी वाटले घराघरात उद्योजकतेचे साहित्य


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जतः प्रभागातील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न सुटावा या महिलांचा आपल्या कुटुंबाला हाथभार लागावा यासाठी कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील तोटे दाम्पत्यानी ब्युटी पार्लर किट शिलाई मशीन आणि केक बनवण्याचे यंत्र या वस्तू मोफत भेट देत स्वयंरोजगारातुन समृद्धीकडे हा मंत्र जोपासला आहे.
कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये तोटे दाम्पत्याने उद्योजक ओंकार तोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महिला भगिनींच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठे सामाजिक योगदान देत ब्युटी पार्लर किट, शिलाई मशीन आणि केक बनवण्याचे यंत्र या वस्तू वाटपाचा कार्यक्रम घेतला , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके हे होते तर  बारामती ग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ सुनंदाताई पवार यांचे हस्ते घेतलेल्या खास कार्यक्रमात घरा घरातील महिलाना या वस्तूचे वाटप करण्यात आले.          
कर्जत येथील प्रभाग सहाच्या काँग्रेसच्या नगरसेविका मोनाली तोटे व उद्योजक ओंंकार तोटे यांच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन ब्युटीपार्लर कीट आणि केक बनवण्याचे यंत्र यांचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमास काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या मोहिनीताई घुले, जिल्हा बँकेच्या संचालिका मिनाक्षी साळुंके, नगरसेवक सचिन घुले, नगरसेविका मनीषा सोनमाळी, डॉ संदीप बरबडे, तात्यासाहेब ढेरे, भाऊसाहेेेब तोरडमल, संतोष म्हेेत्रे,  डॉक्टर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा शबनम इनामदार, नितीन तोरडमल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ सुनंदाताई पवार यांनी तोटे कुटुंबियांच्या कामाचे कौतुक करताना  नगरसेविका मोनाली तोटे यांचे प्रभागातील काम अत्यंत चांगले आहे, नागरिकांच्या घराच्या दरवाजावर स्वतःच्या नावाचा फलक, ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकडे, तक्रारी व अडचणींचे तात्काळ निवारण, नागरिकांच्या सूचनांची अंमलबजावणी, प्रभागातील नागरिकांना शुद्ध पाणी, स्वच्छ व सुंदर प्रभाग असे अनेक विधायक कामे येथे झालेली आहेत,  उद्योजक ओंकार तोटे हे पण धाडसी व कल्पक उद्योजक म्हणून सर्वपरिचित असून त्यांनी अल्पावधीत जे कौशल्याने उभारले आहे ते नक्कीच अभिनंदनिय आहे असे म्हटले व या उपक्रमाचेही कौतुक केले.
  

No comments:

Post a Comment