संत शिरोमणी शेख महंमद महाराज, जीवन कार्य ः दत्तगिरी महाराज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, November 20, 2020

संत शिरोमणी शेख महंमद महाराज, जीवन कार्य ः दत्तगिरी महाराज

 संत शिरोमणी शेख महंमद महाराज, जीवन कार्य ः दत्तगिरी महाराज


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः वाहीरा येथील संत शिरोमणी शेख महंमद महाराज,यांच्या दरबारात दरोरोज चालु असलेल्या महारतीचा  कार्यक्रम   सुरू केला आहे.या महा आरतीला माणीक गडाचे महंत मठाधिपती दत्तगीरी महाराज,आज उपस्थित होते. यावेळी महाराजांनी संत शिरोमणी  शेख महंमद महाराज यांचं थोडक्यात जीवन कार्य सांगितलंॠ
ते  पुढे म्हणाले, गावकर्‍यांनी जो महाआरती चा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. तो खरोखरच कौतुकस्पद व  नावीन्य पूर्ण आहे. बाबांच्या समाधी दर्शनाने व तेथील वातावरणामुळे माणूस शांत,समाधानी होतो. त्या निम्मित सर्व गावकरी एकत्र येतात. एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते. परस्परांमध्ये सौख्याच व जिव्हाळ्याचे वातावरण तयार होते , एक दिवस वाहिरा गाव जगाच्या नकाशात चमकल्या शिवाय राहणार नाही असा आशावाद  त्यांनी व्यक्त केला.  
संत शिरोमणी शेख महंमद महाराज याचं जीवन चरित्र लेखनाचं काम कवी, साहित्यिक किसन आटोळे सर , सिद्धीनाथ मेटे महाराज प्रभोधन समिती (अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य हे करत आहेत.  त्यांचे हि कौतुक केले व महाआरती प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांचे व तरुणांचे देखील खूप खूप कौतुक केले. व म्हणाले जगात खूप मोठे साहित्य आहे. त्या मध्ये कथा , कादंबरी असतील.मात्र काही कादंबर्‍या मध्ये एकाच   व्यकी वरती ज्यास्त भर दिला जातो. मात्र संत  साहित्या मध्ये तस होत नाही . सत्य परस्थितीच त्या मध्ये वर्णन केल जात.त्या मुळे त्यात वेगळीच गोडी निर्माण होते. व पुन्हा  पुन्हा वाचन करावस वाटते आणि ते कोणते साहित्य असेल , तर ते संत साहित्यच असेल . असे प्रतिपादन महंत मठाधिपती ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन किसन आटोळे यांनी केले. आणि आभार सतिश आटोळे उपसरपंच, वाहिरा यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here