आरोपींनी अटक होत नसल्याने बेलवंडी पोलिसांविरोधात उपोषणाचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

आरोपींनी अटक होत नसल्याने बेलवंडी पोलिसांविरोधात उपोषणाचा इशारा

 आरोपींनी अटक होत नसल्याने बेलवंडी पोलिसांविरोधात उपोषणाचा इशारा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः तालुक्यातील पेडगाव येथील जयसिंग दत्तात्रय भिंताडे यांच्यावर 10 ऑक्टोबर रोजी त्यांचे थोरले भाऊ मोहन दत्तात्रय भिंताडे व त्यांच्या दोन मुलांनी बेलवंडी शिवारातील शिंदेवाडी येथील पुलावर दुचाकी गाडीला चार चाकी गाडी आडवी लावून जीवघेणा हल्ला करत जबरी मारहाण केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात 13 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी राजकीय पार्श्वभूमीचे असल्याने पोलिसांनी त्यांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आली नसल्याने ते राजरोस पणे फिरत असून दुसरे भाऊ रुपचंद यांना देखील जिवे मारण्याची धमकी देत असल्याने आरोपी मोहन भिंताडे व त्याची दोन मुले यांना लवकरात लवकर अटक करावी यासाठी फिर्यादी जयसिंग भिंताडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. तालुक्यातील पेडगाव येथील जयसिंग आणि रुपचंद यांचे श्रीगोंदा येथील त्यांचे थोरले भाऊ मोहन दत्तात्रय भिंताडे यांच्याशी ट्रॅक्टरच्या कारणावरून वाद झाला होता त्याच कारणावरून जयसिंग भिंताडे हे 10 ऑक्टोबर रोजी बेलवंडी शिवारात जात असताना थोरले भाऊ मोहन दत्तात्रय भिंताडे व त्यांच्या दोन मुले आदित्य व अनिरुद्ध यांनी बेलवंडी शिवारातील शिंदेवाडी येथील पुलावर दुचाकी गाडीला चार चाकी गाडी आडवी लावून जीवघेणा हल्ला करत जबरी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र आरोपी मोहन यांची पार्श्वभूमी राजकीय असल्याने आरोपी हा फिर्यादी जयसिंग यांचे दुसरे भाऊ रुपचंद यांना रस्त्यात अडवून पोलिसांचे व आमचे मैत्रीचे संबंध असून पोलिस अधिकारी आमचे काही एक वाकडे करु शकत नाही असे सांगत जिवे मारण्याची धमकी देत राजरोस पणें फिरत असल्याने आरोपी मोहन व त्याचे दोन मुले यांना लवकरात अटक करावी अन्यथा 26 ऑक्टोबर रोजी बेलवंडी पोलिसांच्या विरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या समोर कुटुंबीयाासं आमरण करण्याचा इशारा जयसिंग भिंताडे व रुपचंद भिंताडे यांनी पोलिस अधीक्षक अहमदनगर, पोलिस निरीक्षक बेल, आणि तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment