कोळाईदेवी मंदिरात नवरात्रौत्सवात धार्मिक विधी साध्या पद्धतीने
नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः कोरोनाच्या साथीमुळे सर्वच मंदिरे गेल्या सात महिन्या पासून बंदच असून श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील कोळाई देवी मंदिरातील नवरात्रौत्सव व त्या निमित्त आयोजित विविध धार्मिक विधी साध्या पद्धतीने करण्याच्या बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या आवाहनाला कोळगाव येथील नागरिकांनी प्रतिसाद दिला.
कोळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या बैठकीत 17 ऑक्टोबर पासून सुरु होणारा नवरात्रौत्सव प्रथेप्रमाणे सर्व परंपरा जोपासत नऊ दिवसात मंदिरातील घट स्थापना नित्य आरती , सप्तशती पाठ , होम - हवन अभिषेकासाठी मंदिरातील पुजारी , सोहळ्याचे मानकरी यांच्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश न देता साध्या पद्धतीने शासकीय निर्देशांचे पालन करत होणार असून शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे उलंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घेत कोरोना या विषाणूजन्य रोगाला हरविण्यासाठी सर्वांनी सुरक्षित अंतराचे पालन , तोंडाला मास्क लावणे व हात स्वच्छ धुणे बंधनकारक असून नवरात्रोत्सवात कोळगाव व परिसरातील नागरिकांनी काळजी घेत साजरा करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी केले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड, सरपंच वर्षा काळे, उपसरपंच अमित लगड, विजय नलगे, हेमंत नलगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मंदीर समितीचे सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment