बहिरोबावाडी येथे ‘माझं कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत कोरोनाच्या चाचण्या करण्यास सुरुवात ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

बहिरोबावाडी येथे ‘माझं कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत कोरोनाच्या चाचण्या करण्यास सुरुवात !

बहिरोबावाडी येथे ‘माझं कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत कोरोनाच्या चाचण्या करण्यास सुरुवात !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी येथे सोमवारी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने माझं कुटुंब , माझी जबाबदारी या अभियानातंर्गत नऊ लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या सदरील नऊ चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या वेळी नागरिकांमधून ज्यांना कुणाला कोरोनाची चाचणी करावयाची असेल त्यांनी स्वत:हुन पुढे येण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.या प्रसंगी शेतकरी नेते अनिल देठे पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे , माजी सैनिक शिवाजी देठे पाटील , बापू व्यवहारे , बाळु शिंदे , सुनिल साबळे , राजु देठे पाटील , राजु व्यवहारे , शरद व्यवहारे , भिकाजी व्यवहारे , सयाजी आचार्य , किरण व्यवहारे , प्रविण आचार्य , भाऊसाहेब व्यवहारे , पारूबाई व्यवहारे , आरोग्य विभागाचे श्री धुमाळ , आरोग्य सेविका श्रीमती डहाळे , अंगणवाडी सेविका सौ. संगिता व्यवहारे , सौ.सुनिता व्यवहारे , आशाताई सौ.मंगल व्यवहारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment