कोहकडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी चौधरी तर उपाध्यक्षपदी टोणगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

कोहकडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी चौधरी तर उपाध्यक्षपदी टोणगे

 कोहकडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी चौधरी तर उपाध्यक्षपदी टोणगे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः कोहकडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ.आशा जांभळकर व उपाध्यक्ष श्री.संपत टोणगे यांनी दि.29.09.2020 रोजी ठरल्या प्रमाणे वेळेत राजीनामा दिल्याने गुरुवार दि.15.10.2020 रोजी सकाळी 11.30 वा.कोहकडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या कार्यालयात निवड पार पडली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. रामदास बाबा चौधरी यांच्या निवडीची सुचना सौ.बबई जयवंत गायकवाड यांनी केली त्यास श्री. संतोष बाळू कोपनर यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदी श्री.संभाजी सोमा टोणगे यांच्या नावाची सुचना श्री. नामदेव संभाजी गोगडे यांनी केली त्यास श्री.तुळशीराम रामभाऊ गायकवाड यांनी अनुमोदन दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.आर.बी. वाघमोडे व सचिव श्री.बी.एस.वेताळ यांनी काम पाहिले.या पदाधिकार्‍यांची निवड होताच उपस्थित सर्वांना फेटे बांधुन पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
    यानंतर श्री. रत्नेश्र्वराचे सर्वांनी दर्शन घेऊन रत्नेश्र्वराच्या सभामंडपात बैठक घेण्यात आली.या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य श्री.विठ्ठल चौधरी, मा.सरपंच श्री.जयवंत गायकवाड,श्री. राजेंद्र गोगडे यांनी पुढील काळात चांगले काम करावे म्हणून शुभेच्छा दिल्या.सर्वात शेवटी प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ.साहेबराव नामदेव पानगे यांनी पुढील काळात चांगले काम करावे म्हणून शुभेच्छा दिल्या व पारनेर तालुका पंचायत समितीचे मा.सभापती श्री.सुदाम पवार यांच्या मार्गदर्शना खाली दि.21 जूनला कोहकडी येथे भूमिपूजन समारंभ ईॠ लंके यांच्या हस्ते पार पडला.हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे श्री. पवारांचा खूप खूप मोठा प्रयत्न यशस्वी झाला. भावी काळात कोहकडी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेची बिनविरोध निवड करुन सर्वच कुटुंबांना योग्य असा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच डॉ.साहेबराव पानगे यांनी सांगितले. यावेळी मा. अध्यक्ष किसन पवार,सतिश थोरात, लहानु चाबुकस्वार, किसन चौधरी, विठ्ठल चौधरी, गणेश चौधरी,तेजस चौधरी,बाळासाहेब चौधरी, निलेश चौधरी, राजेंद्र गोगडे, अरुण पवार, सुरेश पवार, बाळासाहेब पवार, सुधीर बढेकर, गोरख टोणगे, अरुण टोणगे, जालिंदर झरेकर, संजय झरेकर, विजय झरेकर, संतोष झरेकर, दत्ता जांभळकर, सतिश गोगडे, आनंदा गोगडे, चंदर गोगडे, बाबाजी गोगडे, म्हस्कु गोगडे, भाऊसाहेब गोगडे, संजय खंडेकर, शंकर खंडेकर कैलास कोळपे, बबन टोणगे,नाना टोणगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment