शरदचंद्रजी पवार कोवीड सेंटर सर्वसामान्याचे आधार केंद्र ः हाडोळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 21, 2020

शरदचंद्रजी पवार कोवीड सेंटर सर्वसामान्याचे आधार केंद्र ः हाडोळे

 शरदचंद्रजी पवार कोवीड सेंटर सर्वसामान्याचे आधार केंद्र ः हाडोळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील कर्जुलेहर्या येथील मातोश्री शैक्षणिक संकुलात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यानी उभारलेल्या शरदचंद्रजी पवार कोवीड सेंटर हे सर्वसामान्य गरिब गरजू रुग्णाना मायेचे आधार केंद्र असल्याचे मत नेरूळ ( मुंबई ) येथील वॉर्ड क्र 96 व 97च्या समाजसेविका सुवर्णाताई हाडोळे यानी व्यक्त केले .त्यांचा मुलगा श्लोक याचा वाढदिवस कोवीड सेंटरला साजरा करून रुग्णाना भोजन देण्यात आले त्याप्रसंगी प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या . सौ . सुवर्णाताई हाडोळे पुढे बोलताना म्हणाल्या की आमदार निलेश लंके यानी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात सुरू केलेले काम .आदर्शवत आहे त्या कामाचा आम्हाला रास्त आदर आहे आम्ही मुळ पारनेर तालुक्यातील असलो व मुंबईस्थित असलो तरी आमदार लंके यांचे सर्वासाठी मदतीचा हात पुढे असतो म्हणुनच आम्ही मुंबईवरून येऊन आमच्या मुलाचा वाढदिवस कोवीड सेंटरला साजरा करून रूग्णा ना भोजन दान दिले ही समाजसेवेची संधी आम्हाला आमदार लंके यांच्यामुळेच मिळाली . दादाभाऊ रेपाळे यावेळी बोलताना म्हणाले की आपण समाजाचे काही तरी देण लागतो ही भावना मनात जागृत ठेवुन काम करा हा आमदार निलेश लंके यांचा आदर्श जोपासुन आम्ही निलेश लंके प्रतिष्ठाणचे माध्यमातुन सामाजिक बांधिलकी समजुन या कोवीड सेंटरला भोजन व्यवस्था केली.
    यावेळी निलेश लंके प्रतिष्ठाणचे मुंबई उपाध्यक्ष कैलास शेठ पावडे, सखाराम थोरात गोरख ठुबे विनोद महाराज वरपे , नंदकुमार हाडोळे , डॉ .लंके यांच्या सह मोठ्या प्रमाणावर लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here