कोरोना पार्श्वभूमीवर तुकाईदेवी नवरात्रोत्सव रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

कोरोना पार्श्वभूमीवर तुकाईदेवी नवरात्रोत्सव रद्द

 कोरोना पार्श्वभूमीवर तुकाईदेवी नवरात्रोत्सव रद्द


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर  ः कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने घातलेल्या बंधनामुळे पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील जागृत देवस्थान असलेल्या तुकाई देवी मंदिरात यंदाचा नवरात्रोत्सव दरम्यान होणारे सर्व कार्यक्रम रद्द् करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद घनवट यांनी दिली. 17 ऑक्टोबर पासून सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर  देवस्थानचे विश्वस्त मानकरी यांची देवस्थान  मध्ये बैठक पार पडली यामध्ये केवळ मंदिरातील धार्मिक विधी पार पडणार आहेत. उर्वरीत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे यावेळी सर्वानुमते ठरले.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडेगव्हाण येथील तुकाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवादरम्यान घट बसवले जातात यादरम्यान 9 दिवस उपवास धरला जातो.यादरम्यान दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.मात्र गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने काही नियम व अटी घातल्या आहेत.याचे काटेकोर पणे पालन करत व खबरदारीचा उपाय म्हणून हा नवरात्र उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचेही यावेळी सर्वानुमते ठरले आहे.
       यावेळी सरपंच बाळासाहेब सोनवणे, तुकाई देवस्थान उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, विश्वस्त बाळासाहेब वारे, भानुदास खंदारे, अंकुश शेळके, बाळासाहेब शेळके मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here