अवघ्या 45 दिवसांत 5 कोटी 25 लाख रुपयांच्या ठेवी जमा...... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 14, 2020

अवघ्या 45 दिवसांत 5 कोटी 25 लाख रुपयांच्या ठेवी जमा......

 अल्पावधीतच विघ्नहर्ता पतसंस्थेची गरुडझेप

अवघ्या 45 दिवसांत 5 कोटी 25 लाख रुपयांच्या ठेवी जमा......


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः निघोज येथिल मुख्यालय असलेल्या विघ्नहर्ता पतसंस्थेने अल्पावधीतच गरुड झेप घेतली असुन सभासद,खातेदाराच्या विश्वासास पात्र ठरून अवघ्या 45 दिवसांत 5 कोटी 25 लाख रुपयाच्या ठेवी जमा झाल्या असल्यांची माहीती संस्थेचे अध्यक्ष सुभाष रामचंद्र साठे यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष सुभाष साठे यांनी 23 वर्ष सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगले प्रभावीपणे कार्य केले,आपल्या ज्ञानाचा व सहकार क्षेत्रातिल कामाच्या अनुभवामुळे तसेच त्यांच्या पत्नी सौ.शैला सुभाष साठे या गाडीलगाव, गुणोरे गावचे सरपंच होत्या.त्यांच्या काळात त्यांनी गावचा कारभार पारदर्शी व प्रामाणिकपणे करून जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.  गेली कित्येक वर्ष कुकडी कॅनॉलाचे पाणी लाभधारक शेतकर्‍यांना आपल्या शेतीसाठी वेळेवर मिळावे म्हणून नेहमी प्रयत्नशील राहिले.त्यांनी आपल्या नि:स्वार्थ कामाचा ठसा जनतेत उमटवल्यामुळेच जनतेने त्यांच्या नव्यानेच स्थापन केलेल्या पतसंस्थेला अवघ्या 45 दिवसांतच 5 कोटी 25 लाखाच्या ठेविचा टप्पा पार करण्यांत यश मिळाले.पतसंस्थेतील सर्व कर्मचारी अनुभवी व प्रशिक्षीत असून ते संगणीकृत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासद,खातेदारांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत.आज अखेर संस्थेचे भागभांडवल ठेवी-5 कोटी 25 लाख,कर्ज वाटप-2 कोटी 27 लाख,गुंतवणूक-1 कोटी 90 लाख झाली असल्यांची माहिती संस्थेचे चेअरमन श्री. सुभाष साठे यांनी बोलतांनी सांगितले.
या संस्थेच्या सभासदांना,खातेदारांना,गोरगरीब जनतेला सेवा देण्यांचे काम यापुढील काळातही जोमाने करणांर असून जनसेवेचे पुण्यं आगळे त्यात असे भगवाण मानवा साधून घे कल्याण या संत वचना प्रमाणे संस्थेचे खातेदारांसाठी आर.टी.जी.एस. सुविधा, एस.एम.एस.सुविधा,मोबाईल बँकिंग,चेक क्लेअरिंग,वेगवेळ्या कर्ज सुविधा चालू करण्यांत आलेल्या आहेत.पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब, शेतकरी,व्यावसायिक,उद्योजक,नोकरदार यांनी आजच आपले खाते विघ्नहर्ता पतसंस्थेत खोलून आपण आम्हांला आपली सेवा करण्यांची संधी द्यावी असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री.सुभाष साठे,व्हा.चेअरमन श्री.भाऊसाहेब मदगे व सर्व संचालक मंडळ,कर्मचारी वर्ग यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here