‘के.के.रेंजबाधित शेतकर्‍यांच्या 7/12वरील रेडझोन हटविण्यासाठी प्रयत्न’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 19, 2020

‘के.के.रेंजबाधित शेतकर्‍यांच्या 7/12वरील रेडझोन हटविण्यासाठी प्रयत्न’

 ‘के.के.रेंजबाधित शेतकर्‍यांच्या 7/12वरील रेडझोन हटविण्यासाठी प्रयत्न’

के. के. रेंज कृती समितीच्यावतीने आ.निलेश लंके यांचा सन्मान

राहुल झावरे कार्यक्षम सरपंच ः आ. लंके

  गावातील एक सरपंच गावाचा कायापालट कसा करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे  वनकुटे गावातील कार्यक्षम सरपंच म्हणुन राहुल झावरे काम करत आहेत.आपल्या गावांसाठी व परिसरासाठी काम केले पाहिजे या उदात्त ठेवुन के.के.रेंज असो गावातील इतर प्रश्न सोडविण्यासाठी धडपड चालु असते.के.के.रेंज प्रश्नावर अनेक मुंबई नाशिक दिल्ली वारा झाल्या असुन महत्वपूर्ण कागदपत्रे जमवली होती. त्यामुळे जनतेच्या व पवार साहेबांच्या अग्निपरीक्षेमध्ये पास झालो. 4 दिवस मुक्काम ठोकून हा प्रश्न सोडविला आहे. परंतु काही दलाल पुढारी लोकांच्या  भावनाशी खेळत आहे.वनकुटे व परिसरात 10 कोटी  रूपयांची विकासकामे झाली असुन वनकुटे ते ढवळपूरी हा रस्ता दुरूस्ती करण्यात यावा तसेच वनकुटे पाणीयोजना जुनी झाली असुन या नवीन पाणी योजनेसाठी निधी देण्याात येेेईल असेेेेही आ.लंके यांनी सांगितले आहे.तसेच वनकुटे गाावासह परिसरासाठी वीज - उपकेंद्र उभारण्यात येईल.तसेच तुकाई माता क वर्ग  दर्जा देणार असल्याचे आ लंके म्हणाले.वनकुटे तास भुलदरा आदिवासींच्या वन जमिनी देण्यासाठी विशेष प्रयत्न शासन दरबारी करणार असल्याचे त्यांनी सांगत पठारवाडी तास भुलदरा ठाकरवाडी वाड्या वस्ता डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन आ निलेश लंके यांनी दिले आहे.

आजी - माजी खासदारांकडुनही निराशा...
  के.के.रेंजसंदर्भात आजी- माजी खासदार यांना के.के.रेंजच्या बाधित 23 गावातील शेतकरांनी खासदार संजय विखे पाटील व माजी खासदार दिलीप गांधी यांनी  या विषयाला बगल देवुन अधिग्रहण होणार असे वेळोवेळी जाहिर सांगितले होते. तर काहींनी जमीन अधिग्रहण करण्याच्या दृष्टीने शेतकरी सह्यांची मोहिम राबविली होती. त्यामुळे या दोन्ही आजी माजी खासदारांकडुन निराशा झाली असल्याचे के.के.रेंजकृतीसमितीचे सदस्य सरपंच राहुल झावरे व गणेश हाके यांनी सांगितले आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः गेल्या 30 ते 40 वर्षांपासून के.के.रेंजचे भूत हे पारनेर नगर राहुरी तालुक्यातील 23 गावांच्यामानगुटिवर बसलेले भूत देशाचे नेते शरद पवार यांच्या माध्यमातून उतरविले आहे.परंतु या 23 गावातील शेतकरांच्या सात- बारावर रेडझोन असल्याने राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेकडुन कर्जपुरवठा केला जात नाही. त्यामुळे आता दुसरा टप्पात भुसंपादनानंतर रेडझोन हटविण्याबाबत आपण दिल्ली दरबारी शेतकरांसाठी शरद पवार यांच्या माध्यमातून वित्तविभागाची बैठक घेवुन साता-बारावरील हा रेडझोन हटविण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न करणार आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

शनिवारी के. के. रेंजच्या 23 गावांतील ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. जि.प.सदस्य धनंजय गाडे  राहुरीचे सभापती अण्णासाहेब सभापती प्रशांत गायकवाड अशोक सावंत माजी सभापती सुदाम पवार तालुकाध्यक्ष अशोक घुले सरपंच ड राहुल झावरे के.के.रेंज कृती समितीचे अध्यक्ष गंगाधर जाधव रामदास बाचकर सरपंच अण्णासाहेब खिलारी सुवर्णा धाडगे राजेंद्र चौधरी विक्रम कळमकर उपसरपंच बंडू कुलकर्णी गंगाधर जाधव माजी सरपंच जगदीश गागरे गणेश हाके प्रकाश गाजरे मिठु जाधव रामदास काळे गणेश मधे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते  यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की क्षेत्र अधिग्रहण व मुल्यांकन करणार नाही परंतु ही प्रक्रिया चालु असताना रेडझोनबाबत विषय आता पुढे आला आहे. वित्तविभाग व बँकेच्या अधिकारांशी चर्चा करून याबाबत लवकरच निर्णय होईल अशी माहिती आ.निलेश लंके यांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार व इतरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न कायमचा सोडवू असे आश्वासन देऊन के.के.रेंजच्या नावाखाली विरोधक राजकारण करत असुन लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम करू नका असा टोला विरोधकांना लगावला.  देवळाली कॅम्पमधुन के.के.रेंज संदर्भात महत्वाचे दस्तावेज काढले आहे. त्यामुळे याची राज्य सरकारकडे असणारा फाईल जाळली असल्याचे आ  लंके यांनी सांगितले. पैशापेक्षा तुमची जमीन क्षेत्र जाणार होते 1969 ला पहिले नोटीफेकेशन झाले असुन त्यानंतर आता नोटीफेकेशन पुन्हा निघाले होते.या के.के.रेंज सरावाचा धोका हा मुळा डॅमला मोठा धोका होता त्यामुळे जिल्हाचे धरण ओळखले जात असुन नगर शहरासह इतर औद्योगिक वसाहतीत उद्योगांना पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सध्या जमीन अधिग्रहण विषय संपल्यात जमा असुन रेडझोनबाबत दिल्ली दरबारी लढा देवुन शेतकरांना न्याय देणार असल्याचे आ लंके म्हणाले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here