कोरोनापेक्षाही बेरोजगारीमुळे तरुणाई अस्वस्थ ः पवळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 14, 2020

कोरोनापेक्षाही बेरोजगारीमुळे तरुणाई अस्वस्थ ः पवळे

 कोरोनापेक्षाही बेरोजगारीमुळे तरुणाई अस्वस्थ ः पवळे

तर राज्यातच नव्हे देशात परमनंट कामगार नोटा बटनाचा पर्याय निवडतील, असे मत पवळे यांनी व्यक्त केले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः केंद्र सरकारने परमनंट कामगारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाला विरोधकांंनी केलेला विरोध देखावा करण्यासारखा असल्यामुळे पुढील काळात परमनंट कामगार वर्ग असुरक्षिततेपोटी निवडणुकीत नोटा बटनाचापर्याय हातात घेतील. आज देशभरामध्ये निवडणुकीत तरुणांना आकर्षित करुन तरुणांना नोकरीचे खोटे आमिष दाखवुन सर्वच पक्ष पार्ट्यांनी दिशाभुल केली असुन तरुणांचा प्रचारासाठी आजतगायत वापर केला आहे.सत्ता आल्यानंतर सर्वांनाच तरुणांचा विसर पडला असुन देशाभरामध्ये तरुणाईचा बेरोजगारीचा वाढता उच्चांक गगणाला भिडत असुन भविष्यात याचा मोठा उद्रेक होईल.तरुणांमध्ये वाढत चाललेले नैराश्य लग्नाच्या येणार्या समस्या,भविष्याची चिंता यामुळे अस्वस्थ झालेला तरुण वर्ग राष्ट्राची खरी संपत्ती असताना आपल्यासमोर हतबल होताना दिसत असुन निवडणुकीपुरता वापर तरुणांच्या लक्षात येत असुन सत्ताधार्यांनी केलेल्या फसवणुकीविरोधात पुढार्यांना खुर्चीवरुन खाली घेण्यासाठी राज्यातच नव्हे तर देशातील तरुण वर्ग निवडणुकीत नोटा बटनाचा पर्याय निवडेल याची सर्वपक्षीयांनी नोंद घ्यावी व समाजामध्ये द्वेष पसरवण्यापेक्षा बेरोजगारीच्या प्रश्नावर एकत्र येवुन आपली जबाबदारी स्वीकारावी  अन्यथा परिवर्तनाची लाट समाजात उभी याची सर्वपक्षीय सत्ताधारी विरोधकांनी नोद घ्यावी असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले.

No comments:

Post a Comment