पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार ः आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार ः आ. लंके

 पारनेर नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकणार ः आ. लंके

पारनेरचा पाणीप्रश्न सोडविण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी विरोधकांना बुद्धी दिली नाही

हुकुमशाही नेतृत्वामुळे
 सत्तेत असूनही आमची कामे झाली नाहीत. नेतृत्वाकडून कायमच अपमानाची वागणूक मिळाली. शहराचा पाणी प्रश्न हा फक्त हा निलेश लंकेच सोडवू शकतील त्याच प्रमाणे प्रभागाचा अनुशेषही भरून काढला जाईल म्हणून आम्ही पाचही नगरसेवक लंके साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर आलो आहोत.समाजासठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणार्‍या या सामान्य नेतृत्वाच्या कार्यावर सोशल मीडिया प्रमुख श्रीकांत चौरे यांनी लिहिलेला जीवनपटावर मी समस्त पारनेरकरांच्या वतीने चित्रफीत तयार केली आहे. त्याचे प्रकाशन सर्व उपस्थितांच्या समोर करण्यात आले.व ही चित्रफित सर्वांसाठी सार्वजनिक करण्यात आली आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले पारनेर शहर झाले,पारनेर मध्ये येणारा मोठा नोकरदार वर्ग हा सुख सुविधा मिळणार म्हणून पारनेर शहरात वास्तव्य करण्याचा विचार करू लागले परंतु पारनेर नगरपंचायत वर ज्यांचा अंकुश होता त्यांनी पारनेर नगरपंचायत मध्ये पूर्णपणे दुर्लक्ष करत विकासाचे वास्तव भकास करून टाकले.गेले पाच वर्षात नगरपंचायतीच्या माध्यमातून कुठल्याही मूलभूत सुविधा व विकासाचा नियोजन आराखडा  नगरपंचायत देऊ शकली नाही याला जबाबदार कोण ? असा सवाल करत नाव घेता आमदार निलेश लंके यांनी मा.आ.विजयराव औटी व नगरपंचायतीचा खरपूस समाचार घेतला व येत्या निवडणुकीत पारनेर नगर पंचायत ही राष्ट्रवादीच्याच ताब्यात असणार व मि ती 17/0 करणारच असा आश्वासक निर्धार आमदार लंके यांनी जाहीर सभेत केला व नगरपंचायत ताब्यात आल्यानंतर मी पारनेर शहराचा चेहरामोहरा कसा बदलणार याची मांडणी अभ्यासू पद्धतीने पारनेरकरां समोर मांडली.
पारनेरच्या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले त्यावेळी, गावाचे आता शहर होणार याचा आनंद पारनेरकरांना झाला होता.परंतु येथे ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,ना कचरा व्यवस्थापन,क्रीडा संकुल,बगीचे तर नाहीच नाही असे सांगताना या नगरपंचायती विषयी इतर शहरात बोलताना कमीपणा वाटतो त्यामुळे शहराचा काय विकास झाला ? असा सवाल करत आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्या बरोबरच शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली.
शहरातील बाजारतळा जवळील जि.प.मुलींची प्राथमिक शाळा वर्गखोल्यांचे भूमिपूजन आ.लंके यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या वतीने निलेश लंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ पी.आर.कावरे होते. सध्या सोशल मीडियावर गाजत असलेला गावरान मेवा फेम गणप्या म्हणजे अभिनेते महेश काळे यांनी आ.लंके यांचा जीवनपट उलगडून दाखवला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर नगर विधानसभा अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे,मा सभापती सुदाम पवार,सुवर्णाताई धाडगे,कविता औटी,संजय मते,विक्रम कळमकर, रा.या.औटी, सभापती प्रशांत गायकवाड, ड.राहुल झावरे, राजेंद्र चौधरी, विजय औटी, नगरसेवक नंदकुमार देशमुख, डॉ.मुदस्सर सय्यद, किसन गंधाडे, नंदकुमार औटी, आनंदा औटी, श्रीकांत चौरे,डॉ. कावरे,शैलेंद्र औटी,राजेंद्र खोसे, राजेश चेडे,अशोक कावरे,चंद्रकांत मोढवे,उद्योजक सहदेव तराळ, भाऊसाहेब भोगाडे, अरुण कळमकर अंबादास काकडे, नगरसेविका विजेता सोबले,नंदा देशमाने,वैशाली औटी,संगिता औटी, उमाताई बोरुडे, वैजयंता मते, लीलाताई बोरुडे, पाकीजा शेख, यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले की, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडविणार असून, क्रीडा संकुल हे भकास झालेय. अद्ययावत क्रीडा संकुल तयार करून या संकलातून नॅशनल खेळाडू गेले पाहिजेत असे काम आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे शहरात अद्ययावत असे पारनेर एस.टी.स्टँड बनविणार, याच ठिकाणी सर्व ऑफिसेस, कॉम्प्लेक्स, कर्मचार्‍यांना राहण्याची सुविधा त्याचप्रमाणे प्रवाशांना मुक्कामाची राहण्याचा प्रश्न आला तर ती ही सुविधा निवारा गृह हे सर्व कामे करणार आहे. नगरपंचायतीला साधा कर्मचार्यांचाही प्रश्न सोडविता आला नाही.कर्मचारी अधिकृतपणे नगरपंचायतकडे वर्ग नाही, शिक्षणाअभावी वर्ग करूच शकत नाही. त्या कर्मचार्‍यांनी पंचायतीत आपले आयुष्य खर्ची केले आहेत.त्यामुळे त्यांचाही आपण प्रश्न सोडविणार असल्याचे सांगत पाच वर्षात नगर पंचायतीला स्वमालकीची इमारत सुद्धा बांधता आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी शहरात एम.पी.एस.सी. यू.पी.एस.सी.च्या अभ्यासक्रमाची अभ्यासिका बनविणार असून जेणेकरून गरिबांची मुले ही अधिकारी झाली पाहिजेत.शहराचा रस्ता दुपदरीकरण, चौकाचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे. एकंदरीत आपण शहराचा चेहरा-मोहरा बदलून पारनेरचे नाव हे राज्यात झळकेल असे आदर्शवत काम करणार आहोत असेही आ.लंके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here