राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धरणे आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 21, 2020

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धरणे आंदोलन

 राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धरणे आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जाणकर यांच्या आदेशानुसार राज्यभर जिल्ह्यात,तालुक्यात जिल्हाअधिकारी,प्रांताधिकारी तालुक्यातील तहसीलदार यांना शेतकरीहीत निर्णयाबाबत निवेदनं देवून धरणे आंदोलनं केले.याबाबत अ.नगर पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष शरदभाऊ  बाचकर,दक्षिणचे रवींद्र कोठारी,युवकचे जिल्हाअध्यक्ष नानाभाऊ जुंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तालुका अध्यक्षांनी कोरोनाबाबत सुचनांचे पालन करुन शांततेत आंदोलनं पार पाडले.याबाबत असे की,जगभरात एकीकडे कोरोना महामारीचे संकट असता,अतिवृष्टीमुळे शेतकरयांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने,पिक पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या रासपवतीने करण्यात आली.
    याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी जिल्हाअध्यक्ष बाचकर,जि.यु.चे नानाभाऊ जुंधारे,सय्यदबाबा शेख,महिला जि.अध्यक्ष सुवर्णाताई जराड,जि.संघटक गंगाराम कोळेकर,संभाजी लोंढें,रभाजी खेमनर,गणेश हाके,दत्तात्रय शिंदे,विलास सैंदोरे,नानासाहेब जगताप, संजय वागमारे,चिमाजी खामकर,पोपट गुलदगड,व इतर सहकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्षांनी व पदाधिकारयांनी शेतकरी हिताबाबत पुढाकार घेऊन, धरणे आंदोलन पार पाडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here