अभय बोरांकडून नगरपंचायतीस मंगल कार्यालय सुपूर्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

अभय बोरांकडून नगरपंचायतीस मंगल कार्यालय सुपूर्द

 अभय बोरांकडून नगरपंचायतीस मंगल कार्यालय सुपूर्द



नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः कर्जतच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 या अभियानास अभय ट्रेंडिंग कंपनीचे अभयशेठ बोरा यांनी आपल्या ताब्यातील मंगल कार्यालय तीन महिन्यांच्या कामकाजासाठी नगर पंचायतीकडे सुपूर्द करून या स्पर्धेच्या अनुषंगाने मोठी जबाबदारी स्वीकारली आहे.
कर्जत येथील उद्योजक अभय क्लॉथ व अभय ट्रेडिंग कंपनीचे मालक अभय सुमतीलाल बोरा यांनी आपल्या भावी अभय शॉपिंग मॉल या नूतन प्रकल्पा साठी कर्जत येथील भाग्यतारा मंगल कार्यालय गेली काही महिन्यापासून भाड्याने घेतले होते, या नूतन प्रकल्पाचे कामकाजही सुरू झाले होते, दरम्यान कर्जत नगर पंचायतच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 मध्ये सहभाग घेऊन कामास सुरुवात झाल्यानंतर विविध कामासाठी जागेची अडचण भासू लागली होती, या अभियानासाठी प्रशिक्षण, स्पर्धेची तयारी, येणार्‍या पाहुण्यांची निवास, व इतर आवश्यक कामासाठी मोठी जागा आवश्यक होती मात्र नगर पंचायत कडे उपलब्ध नव्हती, यादरम्यान श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात जोडलेल्या विविध सामाजिक संघटनातील दानशूर व्यक्तिमत्व अभय शेठ बोरा यांनी ही बाब अत्यंत खुबीने ओळखली व मोठ्या मनाने आपल्या अभय शॉपिंग मार्ट या प्रकल्पाचे काम थांबवत स्वतः भाड्याने घेतलेली जागा आपण भाडे भरत पुढील तीन महिने नगर पंचायतीला या अभियानास सोपविण्याचा निर्णय घेतला व आज याच मंगल कार्यालयात आयोजित पोलीस विभागा दिल्या जाणार्‍या कोरोना योद्धा गौरव कार्यक्रमात अभयशेठ बोरा यांनी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सदर मंगल कार्यालय नगरपंचायतची चावी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या ताब्यातही दिली.
   अभयशेठ बोरा यांनी भाड्याने घेतलेल्या या मंगल कार्यालयाचे आगामी तीन महिन्याचे भाडे ते स्वतः भरणार असून वापर मात्र नगर पंचायती च्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानास केला जाणार असल्याने ही खूप मोठी बाब असल्याचे या वेळी आ रोहित पवार सांगत त्याचे कौतुक केले.
भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अभयशेठ बोरा हे रोटरी क्लब, हरित अभियान, भारतीय जैन संघटना व इतर संघटनांच्या माध्यमातून सामाजीक कार्यात सदैव अग्रेसर राहून काम करत आहेत, गेली दोन वर्षे गावागावात जाऊन पाण्यासाठी श्रमदान करण्याच्या चळवळीचे ते मुख्य भाग होते त्यात ही त्यांनी स्वतः वाहन व्यवस्था करून मोठी जबाबदारी उचलली होती. आपल्या देशात खड्या आवाजातील घोषणासाठी सर्वश्रुत असलेले अभयशेठ यांनी आपल्या वडिलांचा समाज सेवेचा वारसा पुढे चालविला असून आईच्या आशीर्वादाने व कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते सहकार्या च्या मदतीने कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा उत्साह निर्माण होते व यामध्ये सर्व संघटना मधील सर्व सहकार्याची मदत मोलाची ठरते असे यावेळी बोरा यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment