ओला दुष्काळ जाहीर करावा मागणीसाठी रासपतर्फे धरणे आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 21, 2020

ओला दुष्काळ जाहीर करावा मागणीसाठी रासपतर्फे धरणे आंदोलन

 ओला दुष्काळ जाहीर करावा मागणीसाठी रासपतर्फे धरणे आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत  ः महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी उद्धवस्त झाला आहे, यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई थेट  शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली पाहिजे या मागणी साठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेवराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली  दि 20 रोजी कर्जत तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने याची दखल घेऊन शेतकर्‍यांना लवकरात लवकर मागणी मान्य करावी अन्यथा पुढील काळात मोठे आंदोलन उभे करण्यात आले येईल असा इशारा यावेळी भानुदास हाके मेजर व रमेश व्हरकटे  यांनी दिला आहे.
  या आंदोलनात प्रशांत शिंदे, मनोज गलांडे, महेंद्र कोपनर, संभाजी मेरगळ, वसंत केसकर, पांडुरंग खामगळ, नाना आटोळे, श्रीराम देवकाते, छगन गिरे, बापू बिटके, संतोष कानडे, नारायण शिंदे, राजू शिंदे, मनिषा जगताप, स्वाती भगत, कचरनाथ हुलगुंडे,  भाऊसाहेब खामगळ, लक्ष्मण कानडे,  आदी सहभागी झाले होते.
यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे व तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले.

No comments:

Post a Comment