कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यालय कचर्‍याच्या विळख्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यालय कचर्‍याच्या विळख्यात

 कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यालय कचर्‍याच्या विळख्यात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः शेतकर्‍यांना आपल्या मालाची विक्री करण्यासाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यालय व परिसर कचर्‍याच्या सामाज्यात सापडला असून याकडे कोण कधी लक्ष देणार आहे की नाही व हा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न विचारला जात आहे.
कर्जत शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 मध्ये सहभाग घेतला असून यावर्षी हे अभियान अधिकच जोमाने राबविले जात आहे, यासाठी कर्जत नगर पंचायत सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत असून शहरातील विविध सामाजिक संघटना दररोज सकाळी स्वच्छता अभियान राबवत सक्रिय झालेल्या आहेत कर्जत शहरात असलेली विविध शासकीय कार्यालयांची ही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असताना व त्यावर आम्ही काही दिवसापूर्वीच प्रकाश टाकलेला असताना अद्यापही अनेक कार्यालयांमध्ये व कार्यालयांच्या ताब्यात असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे त्याकडे सर्व शासकीय कार्यालयांनी त्वरित लक्ष देणे आवश्यक असताना अद्यापही या शासकीय कार्यालयांना जाग आलेली पहावयास मिळत नाही त्यामुळे अशा कार्यालयांकडे स्वच्छते बाबत नगर पंचायतीने, आरोग्य विभागाने व जबाबदार वरिष्ठ अधिकार्‍यांनी सूचना देऊन व नंतर अधिकृत नोटीस देत कारवाई करणे अपेक्षित आहे. कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यालय भांडेवाडी येथे असून मध्य भागात असलेल्या कार्यालया च्या भोवती विविध व्यवसायिकांना गाळे देण्यात आलेल्या आहेत मात्र या संपूर्ण परिसरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत असून विविध ठिकाणी पिशव्या पडलेल्या दिसत आहे याशिवाय गुटख्याची पाकिटे मोकळ्या पाण्याच्या बाटल्या दारूच्या बाटल्या यासह अनेक पहावयास मिळत असून या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment