बंधार्‍यातील पाण्याचे नगरपंचायतीच्यावतीने जलपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 14, 2020

बंधार्‍यातील पाण्याचे नगरपंचायतीच्यावतीने जलपूजन

 बंधार्‍यातील पाण्याचे नगरपंचायतीच्यावतीने जलपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत शहराभोवती जलयुक्त शिवार योजनेतून बनविलेल्या विविध बंधार्‍यामुळे कर्जतचा पाणी प्रश्न सुटला असून नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले असल्याने आज नगरपंचायत च्या वतीने येथे जलपूजन करण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेत कर्जत नगरपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक मिळवत या योजनेचा अत्यंत चांगला उपयोग करून घेत कर्जत शहराजवळून वाहणार्‍या लेंडी नदी व कान्हुला नदीवर विविध ठिकाणी 26 बंधारे बांधून नदीचे खोलीकरण रुंदीकरण करण्यात आले. या या बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी साठले असून ते बंधार्यावरून वाहू लागले आहे या बंधार्‍याचा कर्जत शहराला अत्यंत चांगला फायदा झाला असून दुष्काळी कर्जतची ओळख यामुळे पुसली गेली आहे असे म्हणत उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आज नगरपंचायतीच्या पदाधिकारी नगरसेवक कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत येथे जलपूजन केले यावेळी नगराध्यक्ष सौ प्रतिभा ताई भैलुमे मुख्याधिकारी गोविंद जाधव या प्रभागाच्या नगरसेविका उषा म्हेत्रे राऊत, सौ वृषाली पाटील, सौ हर्षदा काळदाते, सौ मंगल तोरडमल, सौ मनीषा वडे यांचे सह भाजपाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, अक्षय राऊत, वैभव शहा, अमृत काळदाते, रामदास हजारे आदी सह अनेक जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment