तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय कचर्‍याच्या विळख्यात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय कचर्‍याच्या विळख्यात

 तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय कचर्‍याच्या विळख्यात


कर्जत (प्रतिनिधी):-

कर्जत शहराच्या मध्यवर्ती असलेले तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय कचर्‍याच्या विळख्यात सापडले असून चौ बाजूनी कचरा साचल्याने तो कधी साफ होणार व कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्जत शहराच्या मध्यवस्तीत व बसस्थानकापासून अत्यंत जवळ असलेले कर्जत चे तलाठी व मंडल अधिकारी यांचे कार्यालया भोवती सर्वत्र कचर्‍याचा डेपो बनले असून यामुळे येथे येणार्‍या नागरिकांना अस्वच्छते मध्येच काम करावे लागत आहे सदर कचरा त्वरित उचलला जावा अशी मागणी येथे येणार्‍या नागरिकांमधून केली जात आहे कर्जत शहरात सध्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत शहराला स्वच्छ करण्याची व सुंदर करण्याचे काम सुरू असून यासाठी कर्जत नगरपंचायत सक्रिय झालेली असताना विविध सामाजिक संघटना ही यामध्ये उतरल्या आहेत मात्र शासकीय कार्यालय अद्यापही आपली जबाबदारी ओळखून काम करण्यास तयार नाहीत हे शोकांतिका आहे कर्जत शहरातील काही कार्यालयीन प्रमुखांनी यामध्ये पुढाकार घेत आपण जेथे काम करतो की कार्यालय स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहेत मात्र काही कार्यालय अद्यापही अस्वच्छ असल्याने येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना नगरपंचायत आरोग्य विभाग यांनीच नोटिसा बजावणे आवश्यक असून कायद्याचा बडगा फक्त सर्वसामान्य नागरिकांना न दाखवता तो शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ही ऊ घातला जाऊ शकतो हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी आठ दिवसात विविध शासकीय कार्यालय व त्यांचे परिसर संबंधित कार्यालयांनी स्वच्छ न केला गेल्यास त्या कार्यालया समोर गांधीगिरी करत आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनसंसद सह काही संघटनांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment