ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 21, 2020

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे निवेदन

 ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले या परिसरातील शेतकर्‍यांना आणि राज्य सरकारने तात्काळ शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी आम आदमी पार्टीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यात पावसाची सुरवात झाल्यानंतर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली नाही. याबाबत राज्यभर तक्रारी आल्यानंतर बियाणे व त्याच्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती आणि बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवण शक्ती कमी होती, त्यामुळे शेतकर्‍याला दुबार पेरणी करावी लागली, हे सत्य आहे. अनेक भागात दुबार पेरणी झाली, सोयाबीन सोबतच मुग, उडीद हे पिके बर्‍यापैकी आले होते, परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झालीत. विदर्भात व इतर भागात सोयाबीन वर येलो मोजाक नावाची कीड आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्याच नाहीत आणि ते सोयाबीन कापणी विना नागरणी करावी लागली, हे वास्तविकता आहे.गेल्या महिन्यात जास्ती पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे बोंड (पिक) सडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विदर्भातील संत्रा पिकाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मानव निर्मित पूर आल्यामुळे शेतकर्‍यांचे पिके पाण्याखाली आली होती, तसेच गावातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही पूर्ण पणे मदत मिळालेली नाही. जेथे मिळाली ती फारच तुटपुंजी आहे. दुसरीकडे मागील दोन कर्जमाफीमध्ये अनेक शेतकर्‍यांना कर्ज माफी झालेली नाही. एकूणच राज्यातील शेतकर्‍यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकार कडून शेतकर्‍यांना मदत मिळणे गरजेचे आहे, म्हणून आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले.
    यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा जामखेड तालुका अध्यक्ष बजरंग सरडे,अजय भोसले, रजनीकांत राळेभात, अँड.बिपीन वारे,बाळू सुर्वे, काका रायकर , अतुल खराडे, सुभाष शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here