जास्तीत जास्त सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत ः विक्रम राठोड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 20, 2020

जास्तीत जास्त सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत ः विक्रम राठोड

जास्तीत जास्त सभासद नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत ः विक्रम राठोड

गिरीश जाधव व अक्षय कातोरे यांचा वाढदिवस साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव व युवा सेनेचे अक्षय कातोरे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने शिवालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते भगवा फेटा, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, महिला शहरप्रमुख सौ.अरुणा गोयल, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, दत्ता जाधव, निलेश भाकरे, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक अमोल येवले, परेश लोखंडे, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, काका शेळके, रमेश परतानी, गौरव ढोणे, अभिषेक भोसले, गुड्डू भालेराव, प्राचार्य शिंदे, मुन्ना भिंगारदिवे, अरुण झेंडे, प्रतिक गोयल, सुमित धेंड, स्वप्नील ठोसर, संतोष शिंदे, अक्षय नागापुरे, विठ्ठल कोतकर, विशाल वालकर, मयुर मैड, अमित लढ्ढा, शशिकांत देशमुख, संजय सागांवकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी राठोड म्हणाले, शिवसेनेचे नगर शहरात चांगले वातावरण असून, अनेक युवक शिवसेनेशी जोडले जात आहेत. सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेकडे अनेकांचा ओढा आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे. नगर शहरात शिवसेनेची सभासद नोंदणी सुरु झाली असून, जास्तीत जास्त सभासद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

No comments:

Post a Comment