जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय : कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 13, 2020

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय : कर्डिले

 जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय : कर्डिले

रुईछत्तीसीत शेतकर्‍यांना धनादेशाचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कारखानदारांची बँक मोडून शेतकर्‍यांची बँक करण्याचे काम मी केले. केवळ हार तुरे घेणं हा कार्यक्रमा पाठीमागचा उद्देश नसून सर्व सामान्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन शेतकर्‍यांपर्यंत अंमलबजावणी व्हावी यासाठी शाखेशाखेतून कार्यक्रम करण्यात येत आहेत.
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी, मठपिंपरी, हातवळण, गुणवडी, वाटेफळ,  येथील शेतकर्‍यांना खेळते भांडवलाचा चेक वाटप रुईछत्तीसी येथे वाटप करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राम साबळे हे होते.
जो कामे करतो त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो फालतू लोकांना मी महत्व देत नसल्याचे   माजी मंत्री शिवाजी कर्डीले  यांनी बाळासाहेब हराळ यांनी केलेल्या  आरोपांना प्रतिउत्तर देताना केले.  
कोरोना रोगामुळे शेतकरी, दुग्ध उत्पादक, छोटे मोठे व्यवसायीक अडचणीत आले या  अडचणीच्या काळात जास्ती जास्त फायदा शेतकर्‍यांना व्हावा यासाठी प्रत्येक शाखे शाखेत जाऊन केंद्राच्या राज्याच्या योजना प्रत्यक्ष शेतकर्‍यां पर्यंत पोहचविण्यासाठी आमचा प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात तीन तीन मंत्री असूनही कोरोना च्या भीतीने कुणीही घरा बाहेर फिरकले नाही.
मी लोकात रात्रंदिवस राहात असून लोकांची ऊर्जा मला सतत  मिळत असल्याने मला अजून कोरोना झालेला नाहीए असेही मिश्किलपणे कर्डीले यांनी  नमूद केले.
याप्रसंगी सभापती अभिलाष घिगे म्हणाले, केंदाच्या योजनेनुसार कर्डीले साहेबांनी ही योजना शेतकर्‍यांपर्यंत कार्यान्वित केले. बाजार समितीचा राज्यात नाव लौकिक आहे. जी संस्था चौदा वर्षापूर्वी सव्वा कोटीवर होती आज तिचा या वर्षीचा ताळेबंद 12 कोटींचा आहे. मात्र राजकारणासाठी बाजार समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याप्रसंगी उपसभापती संतोष म्हस्के , रेवणनाथ चोभे , दिलीप भालसिंग , राम राबळे , श्रीकांत जगदाळे,  सुधीर भापकर , सुरेश सुंबे , दादा दरेकर , शुभम भळबरे , प्रभाकर गोरे , सुभाष पवार, नाथा शेटे , बाळासाहेब पडळकर , लक्ष्मण जगदाळे ,रमेश भांबरे,  बाळासाहेब मेटे , दादासाहेब दरेकर, बाबासाहेब खर्से, धनजंय खर्से, संतोष पालवे , बाळासाहेब चेमटे, अशोक शिंदे   यासह पंचक्रोशितील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here