आ.निलेश लंकेंच्या कार्याची शरद पवारांनी घेतली दखल.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 16, 2020

आ.निलेश लंकेंच्या कार्याची शरद पवारांनी घेतली दखल..

 आ.निलेश लंकेंच्या कार्याची शरद पवारांनी घेतली दखल..

लंके प्रतिष्ठानला दिली अत्याधुनिक कार्डीयाक अ‍ॅम्ब्युलन्स!

कोविड केअर सेंटर बाबत पवार साहेबांनी मला विचारणा केली होती. चर्चेअंती पारनेर नगर मध्ये अत्याधुनिक स्वरूपाची रुग्णवाहिका हवी असल्याचे त्यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लागलीत कार्डियक अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करून दिली. शरद पवार साहेबांची जनसामान्यां विषयी असलेली अस्था, काळजी दिसून येते, यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्यास आणखी ऊर्जा मिळत आहे.
- आमदार निलेश लंके



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना काळातील आमदार नीलेश लंके यांच्या कार्याची दखल घेवुन मतदारसंघातील रूग्णांच्या सोईसाठी कार्डीयाक अ‍ॅब्युलन्स दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खा. सुप्रिया सुळे ही अ‍ॅब्युलन्स आमदार नीलेश लंके यांच्याकडे आज पुण्यात सुपूर्द केली.पुण्यातील कौन्सील हॉल येथे अ‍ॅम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संप्पन्न झाला. आमदार लंके यांच्यासह त्यांचे सहकारी सकाळीच पुण्यात पोहचले होते. या अ‍ॅम्ब्युलन्समुळे मतदार संघातील गंभीर आजारी असणार्‍या रूग्णांची मोठी सोय होणार आहे. नीलेश लंके प्रतिष्ठाणकडे या अ‍ॅम्ब्युलन्सच्या देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तब्बल 64 दिवस परप्रांतीय, परजिल्हयातील सुमारे साडेतिन लाख नागरीकांना जेवणाची सुविधा, त्यांच्या प्रवासाची तसेच निवासाची व्यवस्था, 95 लाख रूपयांचे किराणा वाटप तसेच कोरोना रूग्णांसाठी एक हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर अशा अनेक योजना लंके यांनी राबवल्या. आ. लंके हे के के रेंजच्या प्रश्नासंदर्भात दिल्ली येथे गेले होते. त्यावेळी लंके यांनी कोरोना काळात त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहीती दिली. एक हजार बेडचे पवारांच्याच नावाने सुरू करण्यात आलेले आरोग्य मंदीर, तेथील रूग्णांसाठी उकडलेली अंडी, चिकण मटण, पापलेट, सुरमई मासे यासह मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर खा. पवार हे आवाक झाले. अशी सुविधा दिल्यानंतर रूग्ण तेथून डिस्चार्जच घेणार नाहीत अशी टिपन्नी पवार यांनी त्यावेळी केली होती.आ. लंके हे सर्वसामान्य जनतेसाठी आहोरात्र कष्ट घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी रूग्णांसाठी अत्याधुनिक कार्डीयाक अ‍ॅब्युलन्स देण्याचे स्वतः मान्य केले. तेथूनच पुणे येथे संपर्क करून कार्डीयाक अ‍ॅब्युलन्स तयार करण्याच्या सुचना त्यांनी सबंधितांना दिल्या. या अ‍ॅब्युलन्सची बांधणी पुर्ण होउन नगर येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयात तीची नोंदणीही पंधरा दिवसांपूर्वीच झाली आहे. ही अ‍ॅब्युलन्स शुक्रवारी अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मतदारसंघातील नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कडून पारनेर-नगर विधानसभा मतदार संघासाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेची चावी आमदार नीलेश लंके, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव अ‍ॅड.राहुल झावरे, तालुका सचिव कारभारी पोटघन मेजर,भैरवनाथ देवस्थान वाळवणे अध्यक्ष श्री.सचिन पठारे, कोहकडी गावचे मा.सरपंच श्री.अरुण पवार, गोरेगाव गावचे मा.सरपंच श्री. अभय नांगरे, श्री. सचिन साठे, श्री.संतोषढवळे, श्री.दादा दळवी, श्री.संदीप चौधरी, श्री.शिवाजी शिंदे यांनी अजितदादा पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते स्वीकारली. अ‍ॅब्युलन्सवर लंके यांच्या प्रतिष्ठाणचे नाव टाका! कार्डियक अ‍ॅब्युलन्सची बांधणी करण्याच्या सूचना देताना अ‍ॅब्युलन्सवर आ. लंके यांच्या प्रतिष्ठाणचे नाव टाकण्याच्या सूचना खा. पवार यांनी स्वतः दिल्या होत्या.

No comments:

Post a Comment