विधानपरिषदेद्वारे नगर जिल्ह्यात आणखी 1 आमदार मिळणार ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 14, 2020

विधानपरिषदेद्वारे नगर जिल्ह्यात आणखी 1 आमदार मिळणार ?

 विधानपरिषदेद्वारे नगर जिल्ह्यात आणखी 1 आमदार मिळणार ?

सत्यजित तांबेचे नाव आघाडीवर !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यात आणखी एक आमदार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे जी 12 नावे जाणार आहेत यात काँग्रेसच्या कोट्यातून सत्यजीत तांबे यांचे नाव आघाडीवर आहे.

सत्यजित तांबे यांनी 2014 साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे.गेल्या दीड दशकांपासून तांबे यांनी युवक काँग्रेस आणि छडणखच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचं काम केलं आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी काँग्रेसच्या गोटात चार जागा आहेत. त्यापैकी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचं नाव चर्चेत आहे. त्याबरोबरच नसीम खान, रजनी पाटील आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नावाचीही चर्चा आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागां मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य नावांची यादी समोर आलीय. यामध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होतेय.  सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळं सत्यजित तांबे यांना काँग्रेसनं संधी दिल्यास बाप-लेक एकाच वेळी विधान परिषदेच्या बाकावर बसलेले पाहायला मिळू शकतात!
राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष
     विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर जूनमध्येची निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला तर सरकार कोर्टात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment