ठाकरेंच्या राज्यात हिंदूंना आंदोलन करावं लागतय... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

ठाकरेंच्या राज्यात हिंदूंना आंदोलन करावं लागतय...

 ठाकरेंच्या राज्यात हिंदूंना आंदोलन करावं लागतय...

तुळजाभवानीचे मंदिर उघडून घटस्थापना करणार?नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंदिर विरोधाचा निषेध करत उद्या (दि.17) गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून विधिवत घटस्थापना करून नवरात्र उत्सवास सुरवात करणार आहोत. आम्ही आता शांत बसणार नाही. झोपलेल्या तीन पायाच्या लंगड्या सरकारला जाग आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहे. याचा जो परिणाम होईल त्यास सरकार जवाबदार राहील, असा इशारा गौरीशंकर मित्रमंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांनी दिला.
राज्यातील व शहरातील मंदिरे अद्याप बंद असल्याने शनिवारी होणारी घटस्थापना उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गौरीशंकर मित्रमंडळाने घेतला आहे. याबाबत मंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांनी पत्रक काढून राज्य सरकारला इशारा दिला आहे.राज्यातील मंदिरे उघडण्या यावी या मागणी साठी भारतीय जनता पार्टी आग्रही भूमिका घेत आहे. अनेकदा आंदोलने केली मात्र राज्य सरकारने मंदिरांची दारे उघडण्याचा अद्याप निर्णय घेलेला नाहीये. आता भाविकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भूमिकेचा निषेध करत भाविकांसह मंदिराची दारे उघडून नवरात्र उत्सवाची घटस्थापना करणार आहोत. शिवसेनेला स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा विसर पडला आहे. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व आता बेगडी झालेले आहे. त्यामुळेच त्यांना असे अविचार सुचत आहेत. लोढा पुढे म्हणाले, 28 ऑगस्ट रोजी केलेल्या घंटानाद आंदोलनावेळी नवरात्र उत्सवा पर्यंत मंदिरे उघडण्यास परवांगी दिली नाहीतर आम्ही मंदिरे उघडू असे जाहीरपणे सांगितले होते. केंद्र सरकारने देशातील मंदिरे उघडण्याची यापूर्वीच परवांगी दिली आहे. त्यानुसार देशातील सर्व प्रमुख मंदिरे उघडली असून त्याठिकाणाहून करोनाचा संसर्ग न वाढण्यास सर्व काळजी घेली जात आहे. मात्र महाराष्ट्रातच मंदिरे बंद ठेवून केद्र सरकारच्या आदेशास मुठमाती दिली आहे. मंदिरांचे दारे उघडण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यातच हिंदुनांच आंदोलने करावी लागत आहेत. सर्व काही सुरु करत आहेत मग मंदिरेच का बंद? काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादी लागलेल्या शिवसेनेने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली आहे हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. त्यानुसार हिंदू धर्माचे शक्ती स्थान असलेले मंदिरे अजून का बंद?  सरकारला जाग येण्यासाठी आम्ही आता जागृत झालो आहोत. सर्व हिंदू भाविकांनीही आता जागृत व्हावे. भाविकांनी करोना पासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून या घटस्थपना सोहळ्यात सहभागी व्हवे. मंदिरांचे दारे उघडण्यासाठी आम्ही सर्व भाविकांबरोबर आहोत. असे विश्वहिंदू परिषदेचे मठमंदिर समितीचे अध्यक्ष हरिभाऊ डोळसे व मंदिर सुरक्षा समितीचे बापू ठाणगे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here