तोतया सैनिक अधिकारी गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 16, 2020

तोतया सैनिक अधिकारी गजाआड

 तोतया सैनिक अधिकारी गजाआड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लष्कराचा बनावट आयडी व वेशभूषा करून औरंगाबाद रोड वरील अहमदनगर सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या बीटीआर मेन गेटवर तोतया सैनिक म्हणून वावरत असणार्‍या धुळे येथील सोपान पाटील व तुषार पाटील यांना अटक करण्यात आली असून हे दोघे बनावट आयडी व वेश परिधान करून कशासाठी आले याचा पोलिस शोध घेत आहेत. सैन्य अधिकार्‍यांचा वेष धारण करून लष्कराच्या बनावट आयडीसह अहमदनगरच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये घोसखोरी करण्याच्या प्रयत्नात दोन जणांना गुप्तचर अधिकार्‍यांनी पडकले आहेत. अहमदनगर पोलिसांनी दोघांवर कलम 420, 170 आणि 24 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य गेटवर तैनात असलेल्या अधिकार्‍यांना हे दोघेही संशयित असल्याचे आढळले. त्यानंतर अधिकार्‍यांनी त्यांच्या बनावट ओळखपत्राची तपासणी केली. तसेच ही ओळखपत्रे कोठे बनवली याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलमानुसार 420, 170 आणि 24 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रविण पाटील पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here