युवकांद्वारेच बदल शक्यः इथापे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

युवकांद्वारेच बदल शक्यः इथापे

 युवकांद्वारेच बदल शक्यः इथापे

अंतिम चौक मित्रमंडळाच्या युवकांनी साकारले अंत्यविधी रथाचे लोकार्पण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नालेगाव येथील अंतिम चौक मित्र मंडळाच्या युवकांनी पुढाकार घेऊन बनविलेल्या अंत्यविधी रथाचे लोकार्पण मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुंजाळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, माजी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कर्डिले, माजी नगरसेवक अजय चितळे, छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, छावा शहराध्यक्ष गणेश गायकवाड, किशोर शिकारे, अंतिम चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश पोटे, नितीन पोटे, दत्तात्रय वामन आदि उपस्थित होते.
    सामाजिक भावनेने युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. युवाशक्तीच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटण्यासारखी आहे. युवकांद्वारेच बदल घडू शकतो. शहरात अंत्यविधी रथाची गरज भासत असताना अंतिम चौक मित्र मंडळाच्या युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची भावना मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे यांनी व्यक्त केली. विठ्ठल गुंजाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन युवकांना सामाजिक कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष निलेश पोटे यांनी शहरासह उपनगराची लोकसंख्या विचारात घेता अंत्यविधी रथ हे मोजकेच आहे. एखाद्या दिवशी मयत व्यक्तींना अमरधाममध्ये घेऊन जाण्यासाठी रथ उपलब्ध होत नाही. याची जाणीव व गरज लक्षात घेऊन अंतिम चौक मित्र मंडळाच्या युवकांनी पुढाकार घेऊन या रथाची निर्मिती केली असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment