ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने 25 आक्टोबर रोजी ऑनलाईन नॅशनल वेबीनार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने 25 आक्टोबर रोजी ऑनलाईन नॅशनल वेबीनार

 ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने 25 आक्टोबर रोजी ऑनलाईन नॅशनल वेबीनार


अहमदनगर ः संपूर्ण विश्वात आज कोरोना महामारीने अटॅक केला आहे. सगळया विश्वात आजारपण, चिंता, भय, दु:ख पसरलेले दिसत आहे. शिवाय अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचाराने समाज त्रस्त झाला आहे. यामुळे मनाची स्थिरता ढळत चालली आहे. हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, कॅन्सर, अर्धांगवायू सारखे शारिरीक आजार व डिप्रेशन सारखे मानसिक आजार वाढत चालले आहे. या सारख्या आजारपणापासून सुटका होण्यासाठी मेडिसीन सोबत मेडिटेशन करने आवश्यक आहे. म्हणूनच प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विद्यापीठा अंतर्गत मेडिकल प्रभाग द्वारे अवेकनिंग टू अ न्यू वे ऑफ हिलिंग 2020 या विषयावर ऑनलाईन नॅशनल वेबीनार चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर ऑनलाईन नॅशनल वेबीनार दिनांक 25 आक्टोबर 2020 या दिवशी सकाळी 11.30 ते 1 या दरम्यान संपन्न होईल. यात सकाळी 11.30 ते 11.55 पर्यंत मुंबईचे डॉ इ व्ही स्वामीनाथन यांचे ‘कुठल्याही परिस्थितीत मनाची स्थिरता कशी टिकवावी या विषयावर तर सकाळी 11.55 ते 12.20 पर्यंत अहमदनगरच्या डॉ. सुधा कांकरिया यांचे हिलिंग एनर्जी व त्यामागील विज्ञान या विषयावर तर 12.20 ते 1 वाजेपर्यंत अलविदा डायबेटीस या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. सदर वेबीनार मोफत असून सर्व वयोगटातील, सर्व क्षेत्रातील स्त्री पुरूष याचा लाभ घेऊ शकतील. याची लिंक प्राप्त करण्यासाठी कृपया 9850887838 या नंबरवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here