चोरांवर व गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

चोरांवर व गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करा

 बोल्हेगाव येथे तात्पुरत्या स्वरुपातील पोलिस चौकीला मान्यता

चोरांवर व गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव-नागापूर परिसराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या परिसरामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. या टुकार मुलांकडून नागरिकांमध्ये दहशत व भितीचे वातावरण परसवण्याचे काम करत आहे. तसेच रात्री अपरात्री दरोडे व भूरट्या चोराचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या चोरांवर व दहशत करण्यावर पोलिसांची वचक असणे गरजेचे आहे. यासाठी बोल्हेगाव परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरुपात पोलिस चौकीची व गस्तीची मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी शहर पोलिस उपधिक्षक विशाल ढुमे व तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हारुन मुलानी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी पोलिस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातील पोलिस चौकीला मान्यता दिली असून उद्या जागेची पाहणी केली जाणार आहे. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी पोलिस चौकीसाठी जागा देण्याचे मान्य केले. त्यामुळे लवकरच तात्पुरत्या स्वरुपातील पोलिस चौकी सुरू होऊन चोरांवर व गुन्हेगारांवर आळा बसण्याचे काम होणार आहे.
यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक अ‍ॅड. राजेंद्र कातोरे, रमेश वाकळे, संपत वाटमोडे, संपत वाकळे, सुरज कोलते, सारंग कराळे, सनी वाकळे, आकाश वायकर, दशरत वाकळे, गौतम कापडे, सावळाराम कापडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here