माळी समाज ऑनलाईन वधुवर मेळाव्यास प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

माळी समाज ऑनलाईन वधुवर मेळाव्यास प्रतिसाद

  माळी समाज ऑनलाईन वधुवर मेळाव्यास प्रतिसाद

अहमदनगर ः अल्पावधीतच वधूवर पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या  मराठी सोयरीक या संस्थेने माळी समाजाचा ऑनलाईन वधूवर मेळावा जाहीर केला आहे. रविवार दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी दु. 1 वाजता होणा-या माळी समाजाच्या ह्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती मराठी सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक कुटे यांनी दिली आहे. माळी समाजाचा महाराष्ट्रातील हा 1 ला ऑनलाईन मेळावा आहे. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रम वधुवर मेळावे बंद झाले आहेत. त्यामुळे वधुवर पालक चिंताग्रस्त झाले आहेत, म्हणुन त्यांच्यासाठी सलग 2 दिवस ऑनलाईन वधुवर मेळावा घेवून माळी समाजाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 7020281282 या नंबरवर फोटो बायोडाटा पाठवून दिनांक 29 ऑक्टोबर पर्यंत उच्चशिक्षित वधूवरांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर नाव नोंदणी होणार नाही. दिनांक 30 व 31 रोजी 2 दिवस डेमो मेळावा घेवून सर्वांना मेळाव्याचे योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. हा मेळावा ‘गुगल मीट’ या पवर 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. इच्छुक वधूवर स्वतः परिचय देऊ शकतात किंवा त्यांना शक्य नसल्यास संस्था त्यांचा परिचय देईल. ह्या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment