शिवसैनिक एकत्रित राहून शिवसेना पुढे नेतील ः माने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 14, 2020

शिवसैनिक एकत्रित राहून शिवसेना पुढे नेतील ः माने

 शिवसैनिक एकत्रित राहून शिवसेना पुढे नेतील ः माने

खा. धैर्यशील माने यांची शिवालयास भेट.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिवसेनेचे प्रवक्ते व कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी (दि. 13) नगरमध्ये शिवालयास भेट देऊन उपनेते स्व. अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. 
   यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, अरुणा गोयल, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, भगवान फुलसौंदर, संतोष गेनप्पा, संभाजी कदम, अनिल बोरुडे, गणेश कवडे, संजय शेंडगे, काका शेळके, निलेश भाकरे, सुभाष लोंढे, मदन आढाव, संग्राम शेळके आदी उपस्थित होते. यावेळी माने म्हणाले नगर मध्ये गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेचे मोठं वलय आहे स्वर्गीय अनिल राठोड यांनी शिवसेना मोठी करण्यासाठी नगरमध्ये खूप मेहनत घेतली असून त्यांनी आपले जीवन शिवसेनेला समर्पित केले आहे त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांना एकत्रित काम करणे गरजेचे आहे आपल्याला कोणतीही मदत किंवा येणार्‍या अडचणीसाठी आम्ही कायम आपल्यासोबत आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here