करोना रुपी भव्य रावणाचे दहन गौरीशंकर मित्रमंडळाच्या उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 26, 2020

करोना रुपी भव्य रावणाचे दहन गौरीशंकर मित्रमंडळाच्या उपक्रम

 करोना रुपी भव्य रावणाचे दहन गौरीशंकर मित्रमंडळाच्या उपक्रम


नगरी दवंडी/प्र
तीनिधी

अहमदनगर ः  विजयादशमी निमित्त शहरातील गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्ट च्या वतीने 10 फुटी करोना रुपी भव्य रावणाचे दहन करून गेल्या 9 दिवसापासून चालू असलेल्या नवरात्र  उत्सवाची सांगता केली. मंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांच्या हस्ते रावण दहन झाले. यावेळी एल.जी गायकवाड, सदाभाऊ शिंदे, मंडळाच्या अध्यक्षा आरती आढाव, संजय वल्लाकट्टी, सागर शिंदे, विनोद दिकोंड आदी उपस्थित होते. 

  यावेळी वसंत लोढा म्हणाले, जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येते तेव्हा जगदंबा माता धावून येती. सध्या आलेल्या करोनाच्या संकटातूनही जगदंबामाता सर्व भक्तांना सोडवणार आहे. त्यासाठी आज करोना रुपी रावणाचे दहन केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here