चिचोंडी पाटील येथे शिवसेनेची सभासद नोंदणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, October 12, 2020

चिचोंडी पाटील येथे शिवसेनेची सभासद नोंदणी

 चिचोंडी पाटील येथे शिवसेनेची सभासद नोंदणी

अभियान 2020-2022ची सुरुवात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः चिचोंडी पाटील येथे शिवसेनेची सभासद नोंदणी अभियान 2020-2022ची सुरुवात जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी बोलताना प्रा.शशिकांत गाडे सर यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन शिवसैनिकांनी केलेले कामांची आठवण करून दिली त्याच प्रमाणे आजच्या तरुणांनी सभासद नोंदणी करून समाजकारणात योगदान द्यावे. शिवसैनिकाला पक्षात असलेले महत्व यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.
       राज्यात नगर तालुका सभासद नोंदणीत आघाडीवर राहील याच्यासाठी सर्व शिवसैनिंकानी काम करावे असे सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले,जि प सदस्य शरद झोडगे,सभापती इंजि प्रविण कोकाटे  शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत पंचायत समिती सदस्य संदिप गुंड,उप तालुका प्रमुख जिवाजी लगड , शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर,विशाल ससे,मा सरपंच पांडूरंग कोकाटे,कामधेनु पतसंस्था चेअरमन डॉ ययाती फिसके,मा.उपसरपंच डॉ मारूती ससे,मा उपसभापती दत्तात्रय हजारे ,मा प स सदस्य अण्णा कोकाटे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर हजारे,सोसायटी चेअरमन राजेंद्र कोकाटे,मा उपसरपंच कासमशेठ सय्यद ,अजय कांकरिया,ग्रा प सदस्य संदिप सुरवसे,राजू कोकाटे,चंद्रकांत सदाफुले,राजेंद्र इंगळे,भाऊसाहेब ठोंबरे,भाऊसाहेब वाडेकर,प्रा विजय कोकाटे,दत्ता जाधव,सचिन ठोंबरे,दिपक कांबळे,अजीज शेख,प्रशांत कांबळे यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणीस सुरुवात झाली.
यावेळी पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या संखेने  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here