एरंडोली ग्रामपंचायत तसेच रेशनिंग दुकानामधील अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी : भंडारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

एरंडोली ग्रामपंचायत तसेच रेशनिंग दुकानामधील अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी : भंडारे

एरंडोली ग्रामपंचायत तसेच रेशनिंग दुकानामधील अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी : भंडारे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात तसेच रेशनिंग दुकानातील अनागोंदी कारभाराबद्दल चौकशी करून ग्रामपंचायत तसेच रेशन दुकाना मधील मागितलेल्या मुद्दयांची माहिती मिळावी अन्यथा दि. 26 रोजी श्रीगोंदा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निवेदन अप्पर तहसीलदार चारुशीला पवार तसेच गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांना सामाजिक कार्यकर्ते विजय भंडारे यांनी ग्रामस्थांसह दिले.
श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील ग्रामपंचायत कार्यालयाने विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या कॉम्प्लेक्स मधील 7 गाळ्याचा लिलाव तसेच गाळा मालकांची नावे, त्यांच्याकडून जमा केलेल्या रकमे च्या पावत्या, तसेच या गाळ्यांच्या माध्यमातून 2017 पासून ग्रामपंचायत कार्यालयाला किती भाडे मिळाले तसेच महिन्याला किती भाडे मिळाले याची माहिती माहिती अधिकारात मागाऊन देखील मिळाली नसून याबाबत केलेली तपासणी तसेच त्याचा अहवाल देखील चुकीचा दिला. तसेच मागील 5 वर्षातील ग्रामपंचायत चा संपूर्ण निधी तसेच ग्रामपंचायत ला मिळालेले तंटामुक्तीचे बक्षीस कुठे व कशे खर्च झाले तसेच ग्रामपंचायतिच्या सर्व बँक खात्यांचे स्टेटमेंट मिळावे.
रेशनिंग दुकानामधिल ए. पी.एल., बि.पी. एल., अंत्योदय, केशरी तसेच शुभ्र कुपणांच्या याद्या प्रमाणित केलेल्या नसून त्या सर्व लाभार्थी च्या याद्या तहसीलदार श्रीगोंदा यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून मिळाव्यात, त्याच बरोबर गावचे रेशनिग दुकान हे वस्तीवर सुरू असून ते दुकान गावात सुरू करावे. धान्य दुकान मंजूर झाल्यापासून दरमहा दिलेल्या मालाचे नियतन मिळावे .तसेच ऑक्टोबर 2020 पर्यंत च्या ऑनलाईन याद्या मिळाव्यात. अश्या विविध मुद्दयांची माहिती 26 ऑक्टोबरपर्यंत मिळावी तसेच तेथील अनागोंदी कारभाराबद्दल चौकशी करावीअन्यथा तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे एरंडोली ग्रामस्थांमार्फत मोर्चा आयोजित केला जाईल. याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विजय भंडारे यांनी श्रीगोंदा अप्पर तहसीलदार चारुशीला पवार तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांना दिले यावेळी राहुल इथापे, संजय शेळके, प्रदीप इथापे, माधव इथापे, सागर जठार, पप्पू इथापे, मल्हारी शिंदे तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment