निकृष्ट दर्जाच्या कामामूळे शासनाचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात. तर अनेकांचे गेला जीव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 24, 2020

निकृष्ट दर्जाच्या कामामूळे शासनाचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात. तर अनेकांचे गेला जीव

 निकृष्ट दर्जाच्या कामामूळे शासनाचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात. तर अनेकांचे गेला जीव

अष्टविनायक महामार्गाची दुरावस्था

बेलवंडी फाटा ते बेलवंडी हा रस्ता अष्टविनायका मार्गात असून या रस्त्यासाठी अनेक वेळा  निधी मिळून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते काही दिवसापूर्वी या रस्त्यावर करण्यात आलेले दुरुस्तीचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याने यावर  पावसामुळे मोठे खड्डे पडले असून ते तातडीनं दुरुस्त करावा व निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा रस्त्या शेजारील गावांना बरोबर घेऊन रस्तारोको करण्यात येईल असा इशारा पंचायत समिती सदस्य सौ. कल्याणी लोखंडे तसेच बेलवंडी गावचे उपसरपंच उत्तमराव डाके यांनी दिला.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ःश्रीगोंदा तालुक्यातून देवदैठन, उक्कडगाव, बेलवंडी येथून कर्जत तालुक्यातील सिद्धटेक कडे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर मोठं मोठाले खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहन चालकांना वाहन चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. रात्री अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर होऊन अनेकांचे नाहक बळी जात असून संबंधित रस्त्याच्या संधर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कोणतीही दखल घेतली जात नसून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून तातडीने रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
               शिरूर श्रीगोंदा हा अष्टविनायक महामार्गात मोडत असून या मार्गावर असलेल्या देवदैठन, ढवळगाव, उक्कडगाव, बेलवंडी या ठिकाणी रस्त्यावर मोठं मोठाले खड्डे पडले असून नगर पुणे महामार्गावरील बेलवंडीफाटा ते बेलवंडी या 30 किलोमीटर रस्त्याचे नुकतेच 3 कोटी 80 लाख रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र रस्त्या च्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने परतीच्या पावसामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. या मार्गावरून शिरूर, पुणे येथे जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्या तसेच या रस्त्यावर असलेल्या साखर कारखान्यासाठी उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे रस्त्यावर पडलेल्या मोठा खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. रात्री अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावर होऊन अनेकांचे नाहक बळी जात असून संबंधित रस्त्याच्या संधर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कोणतीही दखल घेतली जात नसून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून तातडीने रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here