प्रा. मुंढे यांची राज्य प्राध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
नगरी दवंडी/प्रतिनिधी
शेवगाव ः अंबादास सैदू शिंदे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राध्यापक ,शिक्षक कर्मचारी संघटना पुणे यांनी प्राध्यापक महादेव बाळासाहेब मुंढे यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली.
प्रा .मुंढे यांनी आजवर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात छत्रपती शिवाजी महाराज -शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा तळागाळातील माणसापर्यत पोहचवला आहे,त्याचबरोबर प्रा. मुंढे यांनी बीड येथील आदित्य बी .फार्मसी कॉलेजमध्ये ऑगस्ट 2018 मध्ये प्राध्यापकपदावर आसतना विद्यार्थी व शिक्षक यांचं आर्थिक शोषण व मुलीवर होणार्या अत्याचारापोटी मुंढे यांनी वयाच्या 24व्या वर्षी बीड येथील कलेक्टर एम. के सिंग यांच्या कार्यालयावर हजारो विद्यार्थी घेऊन मोर्चा काढला, कॉलेज प्रशासनाचा गैरकारभार व सरकारला दाखवून कॉलेजवर 17ऑगस्ट 2020 रोजी एऊ ची कारवाई आदित्य बी फार्मसी कॉलेजवर घडवून आणली,त्यांच्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांची निवड झाली असल्याचे मानले जाते.
प्रा. मुंढे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची अहमदनगर,प्राध्यापक ,शिक्षक ,कर्मचारी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली.त्यावेळी प्राध्यापक मुंढे म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील कोणत्याही संस्था चालक यांनी शिक्षकावर अन्याय केला तर आम्ही कधीच खपून घेणार नाही, असे मुंढे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment