महिला सक्षमीकरण कामाची दखल घेऊन बीबीसी लंडन चॅनलच्या पत्रकारांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

महिला सक्षमीकरण कामाची दखल घेऊन बीबीसी लंडन चॅनलच्या पत्रकारांची भेट

 महिला सक्षमीकरण कामाची दखल घेऊन बीबीसी लंडन चॅनलच्या पत्रकारांची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः ग्रामीण विकास केंद्र व कोरो मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथे महिला सक्षमीकरणाचे काम चालू आहे. यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे  अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांनी  श्रीगोंदा येथे  सावित्री  महिला समस्या निवारण केंद्र सुरू करून पाच वर्षे पूर्ण झाली. या केंद्रात एकल महिला , विधवा , परित्यक्ता या भटक्या विमुक्त आदिवासी व कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी वर ही संस्था काम करत असताना पीडित व अन्यायग्रस्त महिलांना या केंद्रात  समुपदेशक, टीमलीडर व सी.आर.सी च्या माध्यमातून न्याय मिळवून दिला जातो. श्रीगोंदा तालुक्यात एकूण दहा गावात चौदाशे कुटुंबासोबत काम चालू असून अन्यायग्रस्त महिलेला  न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते वेळोवेळी त्या गावातील   महिलांशी चर्चा, गाव भेटी ,बैठका ,व मीटिंग घेत असतात . याद्वारे महिलांच्या केसेस श्रीगोंदा केंद्रात येत असतात या केसेस यशस्वीरित्या सोडवण्यासाठी पोलीस यंत्रणा व संस्थेचे बापू ओहोळ, सचिन भिंगारदिवे ,सागर भांगरे, संतोष भोसले ,जालिंदर शिंदे ,काळे मनीषा,छाया भोसले,  ,उज्वला मदने ,सुनिता बनकर , पल्लवी शेलार, ज्योती भोसले ,लता सावंत, राऊत रोहिणी ,मनीषा सिंघम, सारिका गोंड , यशोदा काळे, पुष्पा कुसळकर हे कार्यकर्ते परिश्रम घेत असतात. या सर्व कामाचे नेतृत्व कोरो मुंबई च्या  मुमताज शेख व सुजाता लवांडे करत असून वरिष्ठ पातळीवरील समस्या व अडचणी सोडविण्याचे काम कोरो  मुंबईचे महेंद्र रोकडे व सुजाता ताई खांडेकर नेहमीच करत आहेत . या सर्व कामाची दखल घेऊन , वर्तमानपत्रातील बातम्या वाचून व सोडवलेल्या केसेसचा  विचार करून बीबीसी लंडन न्यू दिल्ली येथील पत्रकार प्राजक्ता घुलप यांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ऑफिसमधील कामकाज समजून सांगितले व भटके विमुक्त ,आदिवासी , एकल महिला , अत्याचारग्रस्त महिला व कौटुंबिक हिंसाचारा विषयी सर्व माहिती सांगितली. हे सर्व कामकाज पाहून प्राजक्ता धुलप ताईंनी संस्थेचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment