राहुरी पारनेर व नगर तालुक्यांतील जमीन के के रेंजच्या सरावासाठी संपादीत केली जाणार नाही ः तनपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 13, 2020

राहुरी पारनेर व नगर तालुक्यांतील जमीन के के रेंजच्या सरावासाठी संपादीत केली जाणार नाही ः तनपुरे

 राहुरी पारनेर व नगर तालुक्यांतील जमीन के के रेंजच्या सरावासाठी संपादीत केली जाणार नाही ः तनपुरे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी पारनेर व नगर तालुक्याच्या 23 गावातील जमीन के के रेंजच्या सरावासाठी संपादीत केली जाणार नसल्याचे  आज उर्जा नगरविकास व आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तहसील कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परीषदेत दिली.
श्री तनपुरे यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले की गेल्या काही दिवसा पासुन संरक्षण खात्याच्या सरावासाठी राहुरी पारनेर व नगर तालुक्यातील 23 गावां मधील जमीन संरक्षण विभाग के के रेंज साठी संपादित करणार असल्याच्या वृतां वरून  ह्या  गांवातील  जनतेत  मोठी  भिती संभ्रमावस्था निर्माण  झाली  होती. म्हणून  ह्या  प्रश्नावर  आम्ही  आमदार  निलेश  लंके  जिल्हा  परिषद  सदस्य  धनराज  गाडे  ह्यांनी  राष्ट्रवादीचे  अध्यक्ष  शरद पवार  ह्यांची  मुंबई  येथे  भेट  घेउन  परिस्थिती  समजावून  सांगितली  होती. त्या वेळी त्यांनी मी  जेव्हा  दिल्ली  येथे  जाईल  तेव्हा  तुम्हाला  घेउन  जाईल  असे  सांगितले  होते. ज्या  वेळी  त्यांची  देशाचे  संरक्षण मंत्री  राजनाथसिंग  ह्यांची  भेट  ठरली  तेंव्हा  मी  स्वतः  कोरोना झाल्याने  दवाखान्यात  उपचार  घेत  असल्याने  त्या  बैठकीला  जाऊ  शकलो  नसलो  तरी  माझे  विधानसभेतील  सहकारी  आमदार  निलेश  लंके  त्या  बैठकीला  उपस्थित  होते. श्री शरदराव पवार ह्यांनी  केंद्रीय  संरक्षण मंत्री  राजनाथसिंग  ह्यांना  ह्या  भागातील  सर्व  परिस्थिती सांगितली. सुमारे  तासभर  झालेल्या  बैठकित सविस्तर  चर्चा  झाली. दरम्यान  आपल्या  भागाचे  खासदार डॉ सुजय  विखे पाटील  ह्यांनीही  संरक्षण मंत्री  ह्यांची  भेट  घेउन  चर्चा  केली.  या नंतर  वरिष्ठ  कार्यालयाच्या  आदेशा  नुसार  नगर  येथील  संरक्षण  विभागाचे वरिष्ठ  अधिकारी  बी  आर  कांनगल  ह्यांनी  ह्या बाबत  खुलासा  केला  की  आम्हाला  के  के  रेंज साठी  कोणतीही  जमीन संपादित  करणार  नाही किंवा  कुठलाही  प्रस्ताव  विचाराधिन  नाही.
दर  5वर्षानी  आमचे नोटिफिकेशन निघते  तसे  नोटिफिकेशन 2021 साली  निघेल  पण  ते  जमीन  संपादन करण्यासाठी नसेल. ह्या  संरक्षण विभागाच्या  अधिकार्‍यांनी  केलेल्या  खुलाश्याने  ह्या  3तालुक्यातील  जनतेच्या  मनातील  संभ्रमावस्था दूर  झाली आहे. ह्या  निर्णयाबद्दल राष्ट्रवादी  काँग्रेसचे  नेते  शरदराव  पवार  ह्यांचे तिन्ही  गावातील  जनतेच्या  वतीने  आभार  मानतो. असे  पत्रकार  परिषदेत श्री  प्राजक्त तनपुरे  ह्यांनी  सांगितले.
ह्या  भागात  रेड झोन  असला  तरी  शेतकरी  वर्गास कोणतीही  अडचण  येणार  नाही  पण  उद्योग  व्यवसायांस अडचण  असल्याचे  सांगून  आपण  त्या बाबत  प्रयत्नशील  असल्याचे  सांगितले.
यावेळी  तहसीलदार  फसलोद्दीन  शेख  पोलीस  निरीक्षक  मुकुंद  देशमुख  नायब तहसीलदार गणेश  तळेकर उपस्थित  होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here