सोबलेवाडीच्या पायल सोबलेचा आ. लंकेंच्या हस्ते सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

सोबलेवाडीच्या पायल सोबलेचा आ. लंकेंच्या हस्ते सत्कार

 सोबलेवाडीच्या पायल सोबलेचा आ. लंकेंच्या हस्ते सत्कार


आमदार निलेशजी लंके यांनी पायलचे अभिनंदन केले आहे.  पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अशीच प्रगती करत राहा असे म्हणत पायलचे कौतुक केले.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
पारनेर तालुक्यातील सोबलेवाडी गावची व सुभेदार मेजर श्री. सावजी सोबले यांची कन्या कु. पायल सावजी सोबले हिने मेडिकल क्षेत्रात महत्वाची समजली जाणारी प्रवेश परीक्षा (छएएढ) मध्ये घवघवीत यश मिळवले आहे. पारनेरचे आमदार लोकनेते श्री. निलेशजी लंके यांच्या हस्ते पायलच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 720 गुणांपैकी तब्बल 641 गुण मिळवत देशात 5745 क्रमांक मिळविला आहे. जवळपास देशभरातून 15 लाखाच्या वर असणार्‍या परीक्षार्थी मधून तिने मिळविलेले यश नक्कीच पारनेर करांसाठी अभिमानास्पद आहे.
तिच्या या यशामुळे नक्कीच पारनेर तालुक्यात  व सोबले परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिने यशस्वी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने नक्कीच दमदार पाऊल टाकले आहे.No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here