पिडीत लोकांचा न्याय संघटनेशी लढा ः अरुण रोडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 17, 2020

पिडीत लोकांचा न्याय संघटनेशी लढा ः अरुण रोडे

 पिडीत लोकांचा न्याय संघटनेशी लढा ः अरुण रोडे

नगरी दवंडी/प्रतिनिधीपारनेर ः पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या माध्यमातून अध्यक्ष,व्यवस्थापक व काही आधिकारी यांनी शेतकरी कर्जदार यांच्या जमीनी कवडीमोल भावात विक्री करून या जमिनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून गीळणकृत केल्या आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या पीडित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटाना लढा देत असल्याचे अन्याय निवारण,निर्मूलन सेवा समितीचे  जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सांगितले.
सैनिक बँक चेअरमन व व्यवस्थापक आपली प्रतिमा उजळवन्यासाठी काही ठराविक सभासदांना चुकीचे मार्गदर्शन करून  आमच्यावर बँकेची बदनामी करतो म्हणुन प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी केली जात आहे. आम्ही सर्व सभासदाना सांगू इच्छितो की बँकेच्या जागरूक सभासद व काही पीडित कर्जदारानां सहकार विभागाकडून अनेक वर्ष  न्याय न मिळाल्याने  त्यांनी शेवटी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून  दाद मागितली होती . औरंगाबाद उच्च न्यायालयाने पीडित कर्जदारांच्या  तक्रारी व कागदपत्राची दखल घेऊन पारनेर पोलीसांना सर्व बँक कागद पत्राची तपासणी करून सर्वांचे जबाब घेऊन आर्थिक गैरव्यवहार झाला तरच गुन्हे दाखल करावेत अशी आर्डर केली .त्यामुळे पारनेर पोलिसांनी तक्रारदार  यांची  दखल घेऊन  बँकेतील कागद पत्राची तपासणी करून ज्या ज्या प्रकरणात गैरव्यवहार  दिसून आला त्या त्या  प्रकरणाची फाइल बनवून जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठवल्या होत्या व पाठवल्या आहेत. त्या फाईल मधील रेकॉर्डच्या आधारे व्यवहारे,कोरडे यांच्यावर 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत व अजुन काही गुन्हे दाखल होणार आहेत त्यामुळे आम्ही त्या सभासदाना  अवाहन करतो व्यवहारे,कोरडे यांनी कायदेशीर काम केले तर कर्जदार, खातेदार फसवणूक प्रकरणी आतापर्यंत व्यवहारे,कोरडे यांच्यावर 3 ते 4 गुन्हे का दाखल आहेत याचा जाब व्यवहारे व कोरडे यांना विचारावा व बँकेच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात म्हणून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर सहकार विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी करावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here