सुपा-शहाजापूर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थ जीव मुठीत धरून जातात मॉर्निंग वॉकला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 13, 2020

सुपा-शहाजापूर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थ जीव मुठीत धरून जातात मॉर्निंग वॉकला

 सुपा-शहाजापूर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थ जीव मुठीत धरून जातात मॉर्निंग वॉकला

पारनेरचे आमदार निलेश लंके यानी लक्ष्य घालून सुपा शहाजापुर रस्ता दुरुस्त करून त्याचे रुंदीकरण करावे व सुप्याच्या बाजुने तीन ते चार किलोमीटर पर्यत दुतर्फा  स्ट्रिट लाईट बसवावी जेणेकरुन शहाजापुरकराचा प्रवास सुखरूप होईल व सुपेकरांची सकाळ संध्याकाळ निरोगीमय शुभ होईल.यासंदर्भात लवकरच आमदार लंकेना भेटून विनंती करणार आहे .
                           -जालिंदर शिंदे, व्यावस्थापक ,भाग्यलक्ष्मी पंतसस्था सुपा.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील सुपा शहाजापुर रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून हा रस्ता पूर्णपणे मोडकळीस आला असल्याने आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या ग्रामस्थांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
शहाजापुर-सुपा रस्ता म्हणजे हजारो सुपेकराचा जाँकीग ट्रॅक सकाळ संध्याकाळ असंख्य नागरिक फिरण्यासाठी याच रस्त्याने ये जा करत असतात. यात महीला, मुली, मुले, वृद्ध यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून हा रास्त खुपच खराब झाल्याने फिरायला व्यायामाला जाणार्‍या ग्रामस्थांची दिवसाची सुरूवातच खराब होत आहे.              याला कारण म्हणजे बरेच दिवसापासून या रस्त्याची दुरुस्तीच नाही.सततचा पाऊस व सुझलाँन कंपनीचे  अवजड वहाने यामुळे या रस्ताची पुरती वाट लागली आहे. आज घडीला रस्तात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच समजायला मार्ग नाही. वहान चालक खड्डे चुकवताना पायी चालनारांच्या अंगावरती गेल्याने अनेक वेळा लहान मोठे अपघात याठिकाणी झाले आहेत.
सुपा शहाजापुर रस्ता हा वहानांची वर्दळ कमी व दोन्हीही बाजुनी रहवाशी वस्ती आसल्याने सुरक्षित म्हणून सुप्यातील बहुतांशी नागरिक फिरण्यासाठी शहजापुर रस्त्यावर जातात यात जेष्ठ नागरिक  युवक महीला व शाळकरी मुलांची संख्या लक्ष्यनिय आसते. तर शहाजापुरच्या नागरिकांना काम व बाजारपेठेच्या दुष्टीने हाच मुख्य रस्ता आहे.खड्ड्याच्या रस्त्यामुळे दुध वहानातुळ दुध हिसळून शेतकर्यांचे खुप नुकसान होत आहे. तर कित्येक वेळा खड्डा चुकवायच्या नादात वहानचालकाकडून गाडी पादचार्यांच्या अंगावर गेली आहे तर कधी कधी वहान खड्डातुन गेल्यावर गाळमिस्रीत पाण्याचा सकाळ- संध्याकाळ जलाअभिषेक पायी चालणारांच्या अंगावर घातला जात आहे.  दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपला आसल्याने या रस्त्याकडे कुणाचेच लक्ष नाही व ज्यांची आवजड वहाने जातात तेही याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मॉर्निंग वॉक करणारांची दिवसाची सुरवात मात्र खराब होत आहे.
याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित आधिकार्यांनी लवकरात लवकर लक्ष्य घालून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here