सैनिक बँक आधिकार्‍यांनी निराधार योजनेतील अनुदान रक्कम केली हडप, जिल्हाधिकार्‍यांचे दुर्लक्ष! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

सैनिक बँक आधिकार्‍यांनी निराधार योजनेतील अनुदान रक्कम केली हडप, जिल्हाधिकार्‍यांचे दुर्लक्ष!

 सैनिक बँक आधिकार्‍यांनी निराधार योजनेतील अनुदान रक्कम केली हडप, जिल्हाधिकार्‍यांचे दुर्लक्ष!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर सैनिक  बँकेच्या अधिकारी व पदाआधिकारी यांनी संगनमताने संजय गांधी निराधार योजनेतील रक्कम हडप केली  ही गंभीर बाब असताना नगर जिल्हाअधिकार्‍यानीं अक्षम्य दुर्लक्ष केले असून सैनिक बँक आधिकार्‍यानां पाठीशी घालत असल्याचा आरोप उपोषणकर्ते अन्याय निवारण,निर्मूलन सेवा समितीचे  जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, जिल्हा उपाध्यक्ष,आकाश वाबळे पारनेर तालुका अध्यक्ष
पप्पू कासोटे,भरत हाटावकर, विनायक गोस्वामी यांनी केला आहे.
    पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत शाखाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमताने राजीव गांधी निराधार योजना व इतर योजनेतील अनुदान रक्कम हडप केली आहे तसा अहवाल जिल्हा लेखापरीक्षकांनीं सहकार आयुक्त यांना दिला होता.त्यावर सहकार आयुक्त यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले असूनही
जिल्हाधिकारी सैनिक बँकेच्या अधिकारी व संचालक मंडळ  यांच्यावर शासकीय गुन्हा दाखल  करण्यास  हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत.
दरम्यान उपषोंण बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा 8 वा  दिवस असून त्वरीत जिल्हाधिकारी यांनी निराधार योजनेतील रक्कम हडप करणार्‍या त्या सैनिक बँकेच्या अधिकारी व पदाधिकार्‍यांवर शासकीय गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment