हजरत ख्वाजा सुफी संत मोहम्मद इस्माईलशाह मजीदी यांच्या दर्गाह शरीफ कामाचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 22, 2020

हजरत ख्वाजा सुफी संत मोहम्मद इस्माईलशाह मजीदी यांच्या दर्गाह शरीफ कामाचे भूमिपूजन

हजरत ख्वाजा सुफी संत मोहम्मद इस्माईलशाह मजीदी यांच्या दर्गाह शरीफ कामाचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे ईस्माइल शहा मजीदी यांच्या भव्यदर्गाह शरीफ कामाचे भूमिपूजन सज्जादा नशीन रफीकमियाँ इस्माईली व शफिकमियाँ  टाकळी ढोकेश्वरचे माजी सरपंच शिवाजी खिलारी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना अजीजभाई हावलदार म्हणाले की सुफी संत मोहम्मद ईस्माईली शहा मजिदी हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात राजस्थान हैद्राबाद उत्तर प्रदेशमधील सर्व जातीधर्माचे अराध्य दैवत आसुन काही दिवसापुर्वी त्याचे देहावसन झाले त्यांचे जन्मभुमितच भव्य दर्गा बांधकाम करण्याचा भाविकांचा मनोदय आसुन राज्यात आदर्श असा दर्गा शरिफ एक सर्वधर्मसमभावाचे तिर्थक्षेत्र नगर कल्याण महामार्गावर होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते चादर अर्पण करून नारळ वाढवुन कामाचा शुभारंभ करण्यात आला
कार्यक्रमासाठी टाकळी ढोकेश्वर .गावचे माजी सरपंच शिवाजीराव खिलारी,सुनीता झावरे, बाळू खिलारी गुरुजी, ग्रामसेवक मोहिनी तरवडे ,विठ्ठलशेठ मुंडे दिलावरशेठ इनामदार,मौलाना लालमोहम्मद,अँडव्होकेट समीर पठाण,जावेद इनामदार,चांदशेठ इनामदार,अन्वर हवालदार,अल्ताब शेख, सलिम शेख शिराज हवालदार,राजू हवालदार,नाजीम मण्यार,पत्रकार संजय मोरे व भाविक उपस्थित होते. शिराज हवालदार यानी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here