जातेगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार ः आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 24, 2020

जातेगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार ः आ. लंके

 जातेगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार ः आ. लंके

विविध विकासकामांचे लोकार्पण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः गेल्या पंधरा वर्षांत विकासाच्या दृष्टीने तालुका भकास केला असून पुढील काळात जातेगावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे विविध विकास कामाचे भुमिपुजन व भैरवनाथ देवस्थानच्या रस्ता लोकार्पण आ.लंके हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.
आमदार निलेश लंके पुढे म्हणाले की, जातेगाव मध्ये विकास कामाला निधी कमी पडून देणार नाही जातेगाव श्री काळभैरवनाथाची पावन भूमी आहे. येथे राज्यभरातून भाविक येतात त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवणे  भैरवनाथ देवस्थान व जातेगाव ग्रामस्थाचे काम आहे.  त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी भैरवनाथ देवस्थानने केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकच्या वेळी ग्रामस्थांनी केलेली मदत मी  विकास कामांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
यावेळी पारनेर नगर मतदार संघाचे अध्यक्ष  अशोक सावंत,माजी पं स सदस्य राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, राळेगणसिद्धीचे माजी सरपंच जयशिंग मापारी, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष तथा कडूसच्या माजी सरपंच पूनमताई मुंगसे,  भैरवनाथ देवस्थान ट्स्टचे अध्यक्ष अर्जुन बढे, उपाध्यक्ष विजय जर्‍हाड, सचिव प्रभू गायकवाड, बांधकाम विभागाचे अभियंता  पी एन धृपद,  भोयरे गागर्डचे मा. उपसरपंच दौलत गांगड,ग्रा स बाजीराव कारखीले, हरिदास जाधव,संदीप चौधरी,  ग्रामसेविका वैशाली औटी बन्सीभाऊ ढोरमले, सुरेश ढोरमले,  आकाश गायकवाड,  गणेश पोटघन,  आरती ढोरमले,  छबुशेठ फटांगडे, गणेश ढोरमले, दत्तात्रय पोटघन, संजय गायकवाड, मारूती पोटघन, मा. सरपंच विठ्ठल पोटघन, उपसमिति अध्यक्ष विशाल फटांगडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारभारी पोटघन मेजर यांनी केले व आभार माजी सरपंच सुभाष ढोरमले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here