वडनेरकरांच्या प्रेमातून उतराई होण्याची वेळ आली ः आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 23, 2020

वडनेरकरांच्या प्रेमातून उतराई होण्याची वेळ आली ः आ. लंके

 वडनेरकरांच्या प्रेमातून उतराई होण्याची वेळ आली ः आ. लंके

भविष्यात वडनेर हवेलीच्या विकासकामांसाठी झुकते माप

ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला त्वरित मान्यता देत कर्डिले मळा ते वडनेर हवेली वडनेर हवेली फाटा ते वडनेर हवेली रस्त्यांना निधी उपलब्ध करून देऊ असे आ. लंके यांनी सांगितले तसेच कर्डीले वस्ती येथील ट्रांसफार्मर बाबत प्रश्न मार्गी लावावा याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या गावातील एका देवस्थान चा रस्ता खुला करणे बाबत आमदार लंके यांनी प्रशासनाला सूचना केल्या भविष्यात वडनेर हवेली विकासापासून वंचित राहणार नाही असेही आ.लंके यांनी यावेळी सांगितले.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः वडनेरकरांनी माझ्यावर दाखवलेल्या प्रेमातून मला उतराई होण्याची वेळ आलेली आहे गावच्या विकासकामांचा राहिलेला अनेक वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
वडनेर हवेली तील रामवाडी येथील दशलक्ष रुपयाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन प्रसंगी आमदार निलेश लंके बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल रेपाळे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड,पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अशोक सावंत,माजी प. स. सदस्य राजू चौधरी,प्रा.संजय लाकूडझोडे, चंद्रकांत मोडवे,पूनम ताई मुंगसे,तुषार सोनवळे, संदीप ठाणगे,अमोल मापारी अतुल शेटे पंचायत समितीचे अभियंता प्रशांत धुपद आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार लंके म्हणाले वडनेर हवेली या गावा बाबत माझे वेगळे नाते आहे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतले आहे त्यामुळे या गावाबद्दल माझ्या मनामध्ये विशेष प्रेम आहे वेळोवेळी निवडणुकीत देखील या गावातून चांगली मदत होत असते त्यामुळे मला गावासाठी अजून काही देने गरजेचे होते ते मी कोरोना मुळे देऊ शकलो नसलो तरी भविष्यामध्ये निश्चित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वडनेर हवेली या गावाने चांगले काम उभे केले आहे त्याचा परिणाम पाणीदार वडनेर हवेली या रुपाने पहावयास मिळत आहे त्या कामाचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले व भविष्यात  पाणी फाउंडेशन साठी मदत करण्याचेही जाहीर केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन सतीश भालेकर यांनी केले. यावेळी भास्कर भालेकर,भाऊ हारदे,रामराव रेपाळे,आबा रेपाळे,रावसाहेब रेपाळे, राणुजी बढे,भाऊसाहेब भालेकर, सचिन बढे,नामदेव बढे, किरण जाधव, विनायक कर्डीले, उत्तम भालेकर, दीपक भालेकर, अंकुश बढे, अरुण बढे, बबन दरेकर, निलेश बढे, शरद भालेकर, शांताराम वाळुंज,वैभव वाळुंज,साहेबराव वाळुंज, सौरभ वाळुंज, अमोल वाळुंज, राहुल रेपाळे, मुकुंद भालेकर, विलास भालेकर, शिवाजी भालेकर, अनिल बढे, राहुल सोनुळे, बाळासाहेब सोनुळे,अविनाश पिंपरकर, पप्पू भालेकर, अक्षय भालेकर, प्रतीक दरेकर, उत्तम कर्डीले, अब्बास शेख, सचिन कर्डीले, सुमित वाळुंज, सुमित बढे, नामदेव भालेकर, सुभाष भालेकर, संदेश वाळुंज, अतुल वाळुंज, स्वप्नील वाळुंज, मिलिंद झिने, संदीप राऊत, रामभाऊ साळवे, सौ स्वप्नाली भालेकर, सौ जयश्री वाळुंज, सौ अल्का हरदे, सौ शारदा दरेकर,माजी सरपंच सौ चंदाबाई रेपाळे, सौ शारदा बढे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here