जुगार अड्ड्यावर छापा 11 जणांवर गुन्हे दाखल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 13, 2020

जुगार अड्ड्यावर छापा 11 जणांवर गुन्हे दाखल!

 3 लाख 58 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त...

जुगार अड्ड्यावर छापा 11 जणांवर गुन्हे दाखल!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सारसनगर मधील हॉटेल सनशाइन मध्ये जुगार खेळताना आढळलेल्या 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोलिसांनी 3 लाख 58 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कुमार किसनदास छाबरिया वय 60 रा. श्रीराम कॉलनी केडगाव, नासीर खान गुलाब खान वय 53 रा. सी आय व्ही कॉलनी मुकुंदनगर, मनिष मच्छिद्र शिंदे वय 20 रा. पाईपलाईन रोड, वैदुवाडी अहमदनगर, माऊली हरिभाऊ बादाडे वय 20 रा. चिपाडे मळा सारसनगर, गणेश रामचंद्र राजपुत वय 60 रा. गवळी वाडा भिंगार, अजय मधुकर कंडारे वय 50 रा. सदर बाजार, भिंगार, शंकर नारायण जमाल वय 54 रा. शिवाजी नगर, कल्याण रोड, विनोद चंदर शिंदे वय 23 रा. बुरूडगाव, छगन शिवाजी खरसे वय 35 रा. कवडगाव ता. नगर, काळू मारूती शिंदे वय 40 रा. वेदूयाडी, सावेडी, बाबासाहेब कर्पे रा. सारसनगर (फरार) अशी आरोपींची नावे आहेत. ही कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील, मा.अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.विशाल धुमे, यांचे मार्गदर्शना खाली सपोनी श्री.प्रविण पाटील, पोसई. पंकज शिंदे, सफो/आर एस मुळे पोहे काजी बी नागरगोजे, पोना/राहुल द्वारके, पोना/राजु सुद्रीक, पोना/समीर शेख पोका/अरूण मोरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here